शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
2
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
3
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
4
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
5
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
6
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
7
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
8
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
9
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
10
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
11
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
12
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
13
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
14
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
15
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
16
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
17
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
18
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
19
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
20
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!

बोडी कामावरून मजूर परत पाठविले

By admin | Updated: May 27, 2014 23:42 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत किमान १00 दिवसांचे काम उपलब्ध करून देण्याचे धोरण आहे. या अंतर्गत अनेक ठिकाणी कामाची अंमलबजावणीच होतांना दिसत नाही.

मानापूर/देलनवाडी : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत किमान १00 दिवसांचे काम उपलब्ध करून देण्याचे धोरण आहे. या अंतर्गत अनेक ठिकाणी कामाची अंमलबजावणीच होतांना दिसत नाही. आरमोरी पंचायत समितीच्या महिला सदस्यांनी आपल्या शेतावरील बोडीवरील माती कामावरून मजूर परत पाठविल्याची घटना घडली. लोकप्रतिनिधींच्या या कार्यपद्धतीमुळे आपण कामापासून वंचित राहिल्याचा आरोप मजुरांनी केला आहे.

याबाबत माहिती अशी की, आरमोरी पंचायत समितीच्या सदस्य व पिसेवडधा येथील रहिवासी इंदिरा मोहुर्ले यांच्या स्वमालकीच्या बोडीवर मातीकाम करण्यासाठी ३ लाख रूपयाचा निधी मंजूर झाला. पंचायत समितीमधून पिसेवडधा ग्रामपंचायतीला कामाचे आदेशही मंजूर झाले. रोजगार सेवकाने यादीही प्रसिद्ध केली. २४ जून २0१४ रोजी मजुरांना या कामावर पाठविण्यात आले. प्रत्यक्ष बोडीवर कामासाठी पोहोचल्यावर पं. स. सदस्य इंदिरा मोहुर्ले यांनी मजुरांना काम करू देण्यास मज्जाव केला. त्यामुळे मजूर सतंप्त झाले. आपल्या तोंडचा रोजगार हिरावला, असा रोष त्यांनी व्यक्त केला. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मजुरांची समजूत घालत हे प्रकरण निस्तारले. या प्रकरणाची शासनाने चौकशी करावी, अशी मागणी हरिष सहारे, विनोद भोयर, खुशाल आत्राम यांनी केली आहे.

यासंदर्भात लोकमतने पंचायत समितीचे रोजगार हमी योजना विभागाचे अधिकारी गोपावार यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी फोन उचलला नाही. मात्र पंचायत समिती सदस्य इंदिरा मोहुर्ले यांनी सांगितले की, मी जेव्हा पं. स. सदस्य पदावर नव्हते तेव्हा माझ्या स्वमालकीच्या बोडीवर माती टाकण्याच्या कामाची मागणी २0१२-१३ मध्ये केली होती. त्यावेळी मागणी करून काम झाले नाही. परंतु जुन्या अर्जावर रोहयोतून मातीकाम मंजूर झाले. शासकीय पदावर असतांना आपण निधीतून लाभाचे काम करून घेणे योग्य नाही, असे आपले मत आहे. याबाबत जनताही आक्षेप घेऊ शकते व आपले पं. स. सदस्यत्व धोक्यात येऊ शकते. या कारणाने आलेल्या मजुरांना मी काम करू देण्यास मज्जाव केला, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र मजूर रोहयोच्या कामापासून आपल्याला वंचित करण्यात आला आहे, याची दखल घेण्यात यावी, असा आरोप करीत आहे.

या भागात आधीच काम नाहीत. शासनाने रोहयोच्या माध्यमातून काढलेले कामामुळे चार ते पाच दिवसाची मजुरी मिळाली असती. ते कामही रोखण्यात आले. त्यामुळे आता मजुरांवर रिकामे बसण्याची वेळ आली आहे, अशी माहिती मजुरांनी दिली आहे. (वार्ताहर)