शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंज येथील शिबिरात ३१० रक्तदात्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 23:35 IST

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन देसाईगंजच्या वतीने २६ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३१० जणांनी रक्तदान केले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून उपक्रमाची प्रशंसा केली.

ठळक मुद्देसलग १० वर्षे राबविला जात आहे उपक्रम : संत निरंकारी मंडळाच्यावतीने कार्यक्रमाचे करण्यात आले आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन देसाईगंजच्या वतीने २६ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३१० जणांनी रक्तदान केले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून उपक्रमाची प्रशंसा केली.संत निरंकारी मंडळातर्फे सद्गुरू गुरूबच्चनसिंह महाराज तथा सर्व हुतात्म्यांच्या स्मृतीपित्यर्थ २४ एप्रिल नंतर स्थानिक शाखेच्या सोयीनुसार रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. देसाईगंज शाखेच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन येथे रक्तदान शिबिर आयोजीत केले होते. संत निरंकारी मंडळाचे हे दहावे वर्ष आहे. संत निरंकारी मंडळाच्या वतीने सर्वाधिक रक्तदान केले जाते. मागील वर्षी ४३१ युनिट रक्त संकलित करण्यात आले होते.रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी निरंकारी मंडळाचे देसाईगंज झोनचे प्रभारी किसन नागदेवे होते. प्रमुख अतिथी म्हणून संयोजक आसाराम निरंकारी, माधवदास निरंकारी, रामलाल माहनाली, हरीष निरंकारी, न.प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, सदानंद कुथे, नरेश विठलानी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. आमदार कृष्णा गजबे, जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांनी रक्तदान शिबिराला भेट दिली. शिबिरात २६१ पुरूष व ४९ महिला अशा एकूण ३१० नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले. रक्त संकलनासाठी डॉ. किशोर ताराम, डॉ.अंजली साखरे, डॉ.रिजवान शेख, डॉ. नागपासे, डॉ. नितेश नाकट, धानोरा येथील डॉ. सावसाकडे, कुरखेडा येथील डॉ. ठाकर, आरमोरी येथील डॉ. शेख, देसाईगंजचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक कुमरे, डॉ. इकबाल शेख, डॉ. रश्मी रामानी, डॉ.अंजली भुरले, डॉ. मृणाल नाकाडे, सतीश तडकलावार यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक नानाक कुकरेजा, संचालन लक्ष्मण रामानी तर आभार पुरूषोत्तम डेंगानी यांनी मानले. शिबिरासाठी रोषण नागदेवे, दीपक कुकरेजा, कोमल डोडानी, राजकुमारी डेंगानी यांनी सहकार्य केले.गणेश फापट यांचे २६ व्या वेळी रक्तदानदेसाईगंज नगर परिषदेचे नगरसेवक गणेश जयकिशन फापट यांनी संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले. आजपर्यंत त्यांनी २६ वेळा रक्तदान केले आहे. फापट यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान केले आहे. रक्तदानाने एखाद्याचा जीव वाचू शकतो. त्यामुळे प्रत्येक सशक्त व्यक्तीने रक्तदान करावे, असे आवाहन फापट यांनी केले.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी