शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

जिल्हाभरात १७८ जणांचे रक्तदान

By admin | Updated: September 26, 2015 01:31 IST

सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबिरांचे ठिकठिकाणी आयोजन केले आहे.

गणेश मंडळांचे सामाजिक दायित्व : देसाईगंज, अहेरी, चामोर्शी, मुलचेरा तालुक्यात गणेशोत्सवानिमित्त रक्तदान कार्यक्रमगडचिरोली : सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबिरांचे ठिकठिकाणी आयोजन केले आहे. गुरूवार व शुक्रवारी जिल्ह्यात चामोर्शी, देसाईगंज, अहेरी, मुलचेरा येथे १७८ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले. मुलचेरा : येथे सार्वजनिक गणेश मंडळांनी गुरूवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ४८ जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन नायब तहसीलदार एस़ एऩ पठाण यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पी़ आऱ ठाकरे, वन परिक्षेत्र अधिकारी मेढेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ ़विजय आकोलकर डॉ़ यशपाल चंदे, डॉ़ वीरेंद्र खांडेकर, डॉ़ भरत काकडे आदी उपस्थित होते. या शिबिरात तीन महिलांसह गणेश बंकावार, दिवाकर पेंदाम, हर्षवर्धन बाळेकरमकर, अविनाश चुने, संजय मोरघडे आदींनी रक्तदान केले. शिबिरासाठी बाळू मडावी, पी़ पी़ चलाख, श्रीकांत चव्हाण, संदीप घोगरे, मनोज तिजारे, सचिन गंगासागर, गजानन गेडाम, व्यंकटेश सुनतकरी, वामन मडावी, गजू पोतराजवार, टिकेश दोनाडे, गणेश कुबडे, बंडू गुरनुले, रवी दुर्गे, स्मिता लोणारे, शशीकला मडावी आदीनी परिश्रम घेतले़ चामोर्शी : येथील श्री गणेश युवा मंडळातर्फे रक्तदान शिबिर शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी आमदार डॉ. देवराव होळी, मांतेश श्रीरामे यांनी सहकार्य केले. ३० युवकांनी यावेळी रक्तदान केले. तसेच याप्रसंगी शुगर, हृदय दाब, सिकलसेल, एचआयव्ही, दंत आदी रोगांच्या रूग्णांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. नागदेवते, मंडळाचे अध्यक्ष शरद रामटेके, उपाध्यक्ष प्रतीक राणे, सचिव विकास पेंटलवार, अंकुश संतोषवार, अक्षय लांजेवार आदी उपस्थित होते.देसाईगंज : श्री बालगणेश उत्सव मंडळाच्या वतीने नगर परिषद भवनात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ८४ जणांनी रक्तदान केले. यावेळी न.प.चे उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, संतोष शामदासानी, विलास ढोरे, रासेकर गुरूजी, राजू अग्रवाल आदी उपस्थित होते. गडचिरोली येथील डॉ. अमित शेंडे, डॉ. अर्चना गऱ्हाटे, अजय ठाकरे, देशमुख, मैंद, टेकाडे, पंकज निखारे आदींनी शिबिरासाठी सहकार्य केले.अहेरी : न्यू बाल गणेश मंडळ इंदिरानगर बेघर कॉलनी येथे शुक्रवारी रक्तदान व रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले. यात १६ जणांनी रक्तदान केले. यात संदीप ठाकरे, राकेश मेश्राम, रामकिशन मडकवार, अजित मोहुर्ले, शंकर दंडीकेवार, राहूल आत्राम, विजय ठाकरे, रोहन शुद्दलवार, आकाश सिडाम, चेतन बिटपल्लीवार, कैलाश चंदनखेडे, मोहमद आरीफ कुरेशी, धीरज तुलशीगिरीवार, प्रवीण मेश्राम, देवानंद मडावी, अजय ठाकरे आदींनी रक्तदान केले. मोहमद आसिफ कुरेशी या मुस्लीम दाम्पत्यांनी मंडळासाठी सहकार्य केले आहे व त्यांनी रक्तदानही केले. शिबिरासाठी डॉ. उमाटे, सरिता वाघ, गोपाल महतो, शरद बांबोळे, मन्ना, शैलेश पटवर्धन, दिलीप मेश्राम, रवी मोहुर्ले, रमेश तुलशीगिरवारी, विनोद मांडवगडे, सुनील हजारे, सूरज तुलशीगिरीवार, हरीश आश्राम, स्वप्नील मेश्राम यांनी सहकार्य केले. यावर्षी जिल्हाभरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान ही लोकचळवळ झाल्याचा प्रत्यंतर येत आहे.