शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

माओवाद्यांकडून घातपातासाठी स्फोट; सी -६० जवान थोडक्यात बचावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 11:25 IST

भामरागड तालुक्यातील घटना: दोन जवानांच्या हाताला किरकोळ जखम.

संजय तिपाले / गडचिरोली 

गडचिरोली : नक्षल विरोधी अभियान राबवून परतताना सी - ६० जवानांच्या मार्गावर लोखंडी क्लेमोरने स्फोट घडवून घडवून माओवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला. ही घटना ६ जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजता भामरागड-धोडराज मार्गावर घडली.

माओवाद्यांविरुद्ध सध्या पोलिसांकडून अभियान गतिमान करण्यात आलेले आहे. त्यानुसार भामरागड तालुक्यातील धोडराज परिसरात जवान मोहीम राबवून परतत होते. जवानांवर घातपाताच्या उद्देशाने माओवाद्यांनी आयईडी स्फोटाचा प्रयत्न केला. धोडराज - भामरागड मार्गावरील पुलाजवळ माओवाद्यांनी लोखंडी क्लेमोरने स्फोट केला. यात  दोन जवानांच्या हाताला किरकोळ जखमा झाल्या आहेत.  जवानांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.  परिसरात पुढील शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान, या घटनेने पोलिस अधिक सतर्क झाले आहेत.  

का बिथरले नक्षली?मागील दोन वर्षांत १९ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. शिवाय काही जहाल नक्षल्यांना चकमकीत पोलिसांच्या गोळीचा निशाणा व्हावे लागले. त्यामुळे जिल्ह्यात नक्षल चळवळीची पिछेहाट सुरू आहे. मागील महिन्यात नक्षल नेता नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर ऊर्फ बिच्छु याने पत्नी संगीता ऊर्फ ललिता चैतू उसेंडी या दोघांनी आत्मसमर्पण केले. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे नक्षली बिथरले आहेत.

नक्षलविरोधी अभियान राबवून परतताना माओवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र जवान सुरक्षित आहेत. परिसरात नक्षलविरोधी अभियान सुरु आहे.नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी