शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

गडचिरोलीत भाजपचे 'ओबीसी कार्ड', पण मोहरा बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 16:09 IST

रमेश बारसागडे जिल्हाध्यक्षपदी : गटातटात विखुरलेल्या पक्षाला एकसंघ करण्याचे आव्हान

गडचिरोली : भाजपने संघटन पर्वअंतर्गत राज्यभरातील जिल्हाध्यक्षांची १३ मे रोजी खांदेपालट केली. मात्र, २२ जिल्ह्यांबाबत निर्णय राखून ठेवला होता. यात गडचिरोलीचाही समावेश होता. अखेर ३१ मे रोजी प्रदेश कार्यालयाने उर्वरित जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली. यात गडचिरोली भाजप जिल्हाध्यक्षपदी प्रा. रमेश बारसागडे यांची नियुक्ती करण्यात आली.  आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने पुन्हा 'ओबीसी कार्ड' खेळले, पण प्रशांत वाघरे यांच्या जागी बारसागडे यांच्या रुपाने नवा मोहरा दिला.

भाजप जिल्हाध्यक्षपदी कोणाची निवड होते, याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर ही प्रतीक्षा ३१ मे रोजी दूर झाली. प्रदेश निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती यांनी २२ जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर केली. लोकसभेसह तिन्ही विधानसभा क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत, त्यामुळे संघटनात्मक पातळीवर बहुसंख्येने असलेल्या ओबीसींना संधी देण्याचा पायंडा आहे. काँग्रेसने जिल्हाध्यक्षपद कुणबी समाजातून आलेल्या महेंद्र ब्राम्हणवाडे यांना दिल्यानंतर भाजपनेही २० जुलै २०२३ रोजी प्रशांत वाघरे यांना जिल्हाध्यक्ष करुन कुणबी कार्ड खेळले होते. त्यांचा दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असताना जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया झाली.   पक्षाने तेली समाजातून आलेल्या प्रा. रमेश बारसागडे यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घातली. मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ.देवराव होळी, कृष्णा गजबे, माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सा. पोरेड्डीवार, महिला जिल्हाध्यक्षा गीता हिंगे आदींनी त्यांचे स्वागत केले आहे.

 कोण आहेत रमेश बारसागडे ?रमेश बारसागडे हे चामोर्शीतील शिवाजी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली. नंतर ते भाजपवासी झाले. २०१७ मध्ये त्यांनी कुनघाडा जि.प. गटातून भाजपकडून नशीब आजमावत विजय मिळवला. जि.प. मध्ये कृषी सभापतीपदही भूषविले. शांत, संयमी नेतृत्व म्हणून त्यांची पक्षात ओळख आहे.

 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत लागणार कसभाजपमध्ये गटातटाचे राजकारणात जोमात आहे. अशा परिस्थितीत जिल्हाध्यक्ष म्हणून प्रा. रमेश बारसागडे यांना सर्वांना एकसंघ ठेऊन पक्षाची बांधणी करावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर बारसागडे यांच्यावर जबाबदारी आली, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीZP Electionजिल्हा परिषद