शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी सरकारविरोधात भाजपचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा. घोषणेप्रमाणे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजार हेक्टरी, फळबागधारक शेतकऱ्यांना ५० हजार हेक्टरी मदत देण्यात यावी. महिलांवरील अत्याचार थांबवून दोषींवर कडक कारवाई करावी. जलयुक्त शिवार योजना पूर्ववत चालू करण्यात यावी.

ठळक मुद्देअनेकांचे टीकास्त्र : जिल्हा मुख्यालयासह ११ तालुकास्थळी धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जनादेशाचा अनादर करून सत्तेवर आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेस या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवर अत्यावर वाढले आहेत, असे आरोप करून सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्यावतीने गडचिरोलीसह सर्व तालुकास्थळी मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या धोरणावर टिकास्त्र सोडून असंतोष व्यक्त केला.गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात भाजपच्या वतीने धरणे देण्यात आले. यानंतर तहसीलदरांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. गडचिरोलीतील धरणे आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, नगराध्यक्ष योगिता पिपरे, पं.स. सभापती मारोतराव इचोडकर, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, तालुकाध्यक्ष रामरतन गोहणे, उपसभापती विलास दशमुखे, न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार, नगरसेवक केशव निंबोड, माजी शहराध्यक्ष सुधाकरराव येनगंधलवार, माजी तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, नगरसेविका अल्का पोहनकर, अनिता विश्रोजवार, वर्षा बट्टे, लता लाटकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष दुर्गा मंगर, शहराध्यक्ष पल्लवी बारापात्रे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, सिध्दार्थ नंदेश्वर, गजेंद्र मेश्राम, नरेश हजारे, निलीमा राऊत, अविनाश विश्रोजवार, देवाजी लाटकर, गोवर्धन चव्हाण, डेडूजी राऊत, युवराज बोरकुटे, लोमेश नामदेव कोलते, हेमंत बोरकुटे, उपेंद्र रोहणकर, रामन्ना बोनकुलवार, प्रतिभा चौधरी, पुनम हेमके यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.अशा आहेत मागण्याराज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा. घोषणेप्रमाणे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजार हेक्टरी, फळबागधारक शेतकऱ्यांना ५० हजार हेक्टरी मदत देण्यात यावी. महिलांवरील अत्याचार थांबवून दोषींवर कडक कारवाई करावी. जलयुक्त शिवार योजना पूर्ववत चालू करण्यात यावी. नोकर भरती पोर्टल पुर्ववत सुरू करावे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार द्यावा. बिंदूनामावलीवरील स्थगिती उठविण्यात यावी. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे. थेट जनतेतून सरपंच व नगराध्यक्षांची निवड करण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

टॅग्स :BJPभाजपा