शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कार-ट्रॅक्टरची भीषण धडक, भाजप नेत्याचा जागीच मृत्यू; ट्रॅक्टरचे दोन तुकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2022 16:42 IST

ट्रॅक्टर व कारची समोरासमोर जबर धडक होऊन झालेल्या अपघातात भाजप नेते आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर, चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार हे गंभीर जखमी झालेत.

गडचिरोली : ट्रॅक्टर व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चामोर्शी येथील भाजप नेते व ‘मन की बात’ कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर, अतुल गण्यारपवार हे गंभीररित्या जखमी झाले. ही घटना आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरील रणमोचन फाट्याजवळ गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास घडली.

गडचिरोली  जिल्हा परिषदेचे सदस्य व चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार व त्यांचे भाऊ आनंद गण्यारपवार हे दोघे कारने चामोर्शीहुन ब्रम्हपुरीमार्गे नागपूरला जात होते. दरम्यान, ब्रम्हपूरी तालुक्यातील रणमोचन फाट्याजवळ समोरुन येणारा ट्रॅक्टर व कारची धडक झाली. ही धडक इतकी जबरदस्त होती की ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. यात आनंद गण्यारपवार हे जागीच गतप्राण झाले तर, त्यांचे भाऊ अतुल गण्यारपवार तर अतुल गण्यारपवार यांच्या मानेला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. कारचालकालाही किरकोळ इजा झाली असल्याचे समजते. तर ट्रॅक्टरचालकालासुद्धा किरकोळ मार लागला. मात्र, तो घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

आनंद गण्यारपवार यांच्या अवकाळी मृत्यूने अनेकांना धक्का बसला आहे. अपघाताची माहिती मिळताच ब्रह्मपुरीचे भाजप नेते माजी आमदार अतुल देशकर यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी आणि अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आनंद गण्यारपवार यांच्या अपघाती निधनानंतर तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूcarकार