शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

भाजप सरकार शेतकरीविरोधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:36 IST

संपुआ सरकारच्या काळात कच्या तेलाचे दर आजच्यापेक्षा अधिक असताना पेट्रोल, डिझेलचे दर मात्र आजच्या तुलनेत कमी होते. सध्यास्थितीत कच्चा तेलाचे दर जास्त आहेत किंबहूना ते रोजच वाढत आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढवून भाजपप्रणीत सरकार गरीबांच्या खिशातला पैसा काढुन देशातील निवडक धनदाडग्यांची घरे भरीत आहे.

ठळक मुद्देमाजी आमदारांची टीका : आरमोरीत कांँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : संपुआ सरकारच्या काळात कच्या तेलाचे दर आजच्यापेक्षा अधिक असताना पेट्रोल, डिझेलचे दर मात्र आजच्या तुलनेत कमी होते. सध्यास्थितीत कच्चा तेलाचे दर जास्त आहेत किंबहूना ते रोजच वाढत आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढवून भाजपप्रणीत सरकार गरीबांच्या खिशातला पैसा काढुन देशातील निवडक धनदाडग्यांची घरे भरीत आहे. विद्यमान केंद्र व राज्य सरकार हे शेतकरीविरोधी आहे, अशी घणाघाती टिका काँग्रेसच्या आदिवासी सेलचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. आनंदराव गेडाम यांनी केली.आरमोरी तालुका काँग्रेसच्या वतीने आरमोरी शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा सोमवारी आयोजित करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होतेयाप्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष किशोर वनमाळी, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस समशेरखॉ पठाण, डॉ. नितीन कोडवते, पं. स. सभापती बबिता उसेंडी, माजी सभापती अशोक वाकडे, पं. स. सदस्य वृंदा गजभिये, किरण मस्के, नामदेव सोरते, प्रभाकर टेंभुर्णे, महेश तितिरमारे, मधुकर चौधरी, शालीक पत्रे, जुम्मनभाई शेख, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष नीलकंठ सेलोकर, श्रीनिवास आबंटकर, अकुंश गाढवे, अशोक भोयर उपस्थित होते.शेतकऱ्यांना विविध पिकांसाठी लागणारे खत व किटकनाशकांच्या भावात विद्यमान सरकारने प्रचंड वाढ केली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. विद्यमान सरकार बड्या उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेत आहे, असा आरोप गेडाम यांनी केला.यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मधुकर चौधरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष शालीक पत्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून शक्ती प्रोजेक्टवर नोंदणी केली. यावेळी आरमोरी शहरातील सर्व वॉर्डातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा काँग्रेस आदिवासी सचिव दिलीप घोडाम तर आभार आरमोरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मिलींद खोब्रागडे यांनी मानले.

टॅग्स :BJPभाजपाFarmerशेतकरी