अशोक नेते यांची माहिती : स्थापना दिवस साजरा होणारगडचिरोली : ६ एप्रिल १९८० रोजी स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टीची भारत देशासह जगात आतापर्यंत ११ कोटी सदस्य संख्या झाली आहे. देशाच्या लोकसभेत २९२ पेक्षा जास्त खासदार भाजप पक्षाचे आहेत. याशिवाय अनेक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व आहे. भाजप पक्ष हा देशातच नव्हे तर जगात सर्वात मोठा पक्ष बनला आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.भाजपाच्या पक्ष स्थापना दिवसानिमित्त ६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्यात भाजपच्या वतीने वेगवेगळ्या १५० ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये जिल्हा, तालुका, प्रभाग व वॉर्डनिहाय खुली मॅराथॉन स्पर्धा, रांगोळी, भावगीत तथा देशभक्तीपर गीत, रक्तदान शिबिर व इतर उपक्रम होणार आहेत. भारत देशात भाजपाची १३ राज्यात सत्ता आहे. भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारकडून विविध कल्याणकारी योजना कार्यान्वित करण्यात आले असून अतिशय प्रभावीपणे सरकारचे काम सुरू आहे, असेही खासदार नेते यावेळी म्हणाले.पत्रपरिषदेला भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, रवींद्र ओल्लालवार, रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, प्रकाश गेडाम, सुधाकर येनगंधलवार, गजानन येनगंधलवार, रेखा डोळस, विलास भांडेकर, डेडूजी राऊत, विनोद कुनघाडकर, प्रशांत वाघरे, डॉ. भारत खटी आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन लवकरच होणार आपण केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून गडचिरोली व चिमूर लोकसभा क्षेत्रात पाच हजार कोटी रूपये किमतीचे सहा राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून घेतले आहेत. या मार्गांचे भूमिपूजन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एप्रिल महिन्याच्या अखेरीस होणार आहे, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजप जगात सर्वात मोठा पक्ष
By admin | Updated: April 6, 2016 01:08 IST