शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील चामोर्शी व सिरोंचात मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 18:27 IST

राज्यात व देशात मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर कमी आहे. दिवसेंदिवस तो कमीच होत असल्याने सामाजिक असमतोल निर्माण होण्याचा धोका असताना गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व सिरोंचा तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देगडचिरोलीत जंगलाबरोबरच मुलींचेही संगोपनअभिमानास्पद बाब

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यात व देशात मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर कमी आहे. दिवसेंदिवस तो कमीच होत असल्याने सामाजिक असमतोल निर्माण होण्याचा धोका असताना गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व सिरोंचा तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. याशिवाय आदिवासीबहुल आणि मागास अशा गडचिरोली जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर राज्यातील अनेक जिल्ह्यांपेक्षा अधिक आहे.मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी मागील पाच वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. तसेच शासन मुलींसाठी विविध योजना राबवित आहे. त्यामुळे े‘मुलगा हा वंशाचा दिवा’ ही संकल्पना मागे पडून ‘मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी’ ही संकल्पना रूढ होत चालली आहे. तसेही गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी मुलगा व मुलगी यांच्यामध्ये कोणताही भेदभाव करीत नाही. त्यामुळे मुलाप्रमाणेच मुलीच्या जन्माचेही या कुटुंबांमध्ये स्वागत केले जाते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नेहमीच अधिक राहत आला आहे.एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील दर हजार मुलांमागे मुलींचा सरासरी जन्मदर ९५२ एवढा आहे. चामोर्शी तालुक्यातील मुलींचा जन्मदर दरहजार मुलांमागे १०४० तर सिरोंचा तालुक्यातील मुलींचा जन्मदर १०४५ एवढा आहे. उर्वरित अहेरी तालुक्यात हा जन्मदर ९८१, आरमोरी ९३०, धानोरा ७४९, एटापल्ली ९५८, गडचिरोली ९५९, कोरची ९५२, कुरखेडा ९८१, मुलचेरा ९७५, तर देसाईगंज तालुक्यात ८४६ एवढा आहे. आधुनिकीकरणामुळे नष्ट होत चाललेले जंगल आणि कमी होत असलेली मुलींची संख्या, या दोन्ही गोष्टी गडचिरोली जिल्ह्यात जोपासल्या जात आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य