शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

जनआरोग्य योजना ग्रामीणांसाठी मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:57 IST

महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात केवळ जिल्हा सामान्य रुग्णालय हे एकमेव रुग्णालय संलग्न आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत उपचार करायचा असल्यास जिल्हाभरातील रुग्णांना गडचिरोली गाठावे लागते. अशा स्थितीत ग्रामीण गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना फोल ठरत आहे.

ठळक मुद्देगाठावे लागते जिल्हास्थळ : केवळ एकच रुग्णालय संलग्नित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात केवळ जिल्हा सामान्य रुग्णालय हे एकमेव रुग्णालय संलग्न आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत उपचार करायचा असल्यास जिल्हाभरातील रुग्णांना गडचिरोली गाठावे लागते. अशा स्थितीत ग्रामीण गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना फोल ठरत आहे.गरीब व्यक्तींवर खासगी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया व्हाव्या, या उद्देशाने १ जुलै २०१२ रोजी शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली. १ एप्रिल २०१७ रोजी या योजनेचे नाव बदलवून ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ असे ठेवण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी राशनकार्डधारकांना सुमारे दीड लाख रूपयांपर्यंतच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलला जातो.शासनाने राज्यातील नागरिकांचा विमा काढला असून शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी संबंधित विमा कंपनीवर सोपविण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ही योजना १ जुलै २०१२ पासून सुरू झाली आहे. विमा कंपनीसोबत संलग्न असलेल्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जातात. विमा कंपनीसोबत रुग्णालय संलग्न होण्यासाठी संबंधित रुग्णालयाची बेड क्षमता ३० पेक्षा अधिक असावी, २४ तास एमबीबीएस डॉक्टर व सर्जन उपलब्ध असावे, आयसीयूची व्यवस्था असावी, अशा अटी आहेत. आरमोरी, अहेरी व कुरखेडा येथील रुग्णालये तसेच नव्यानेच झालेले महिला व बाल रुग्णालय या अटी व शर्तींमध्ये बसू शकतात. ही रुग्णालये संलग्न झाल्यास त्या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास मदत होईल. जनआरोग्य योजनेतून प्राप्त झालेल्या पैशातून रुग्णालयात पुन्हा चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल. मात्र गडचिरोली येथील केवळ जिल्हा सामान्य रुग्णालयच कंपनीसोबत संलग्न आहे. त्यामुळे याच रुग्णालयात रुग्णांवर उपचार होतात. परिणामी जिल्हाभरातील रुग्णांना गडचिरोली येथे यावे लागते किंवा मोठी शस्त्रक्रिया असल्यास वर्धा किंवा नागपूर गाठावे लागते. अहेरी, आरमोरी व कुरखेडा रुग्णालयात जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार झाल्यास नागरिकांचा ये-जा करण्याचा त्रास वाचण्यास मदत होईल.६ हजार ४६८ रुग्णांवर शस्त्रक्रियायोजनेच्या सुरुवातीपासून गडचिरोली जिल्ह्यातील ६ हजार ४६८ रुग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यावर १४ कोटी ८५ लाख २९५ रूपये खर्च झाले आहेत. यातील २ हजार ३४४ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यासाठी रुग्णालयाला २ कोटी ६२ लाख ९३ हजार रूपये देण्यात आले आहेत. इतर उपजिल्हा रुग्णालय या योजनेसोबत संलग्न झाल्यास त्यांना शस्त्रक्रियेचे पैसे मिळतील. यातून रुग्णालयात सोयीसुविधा उभारणे शक्य होणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाने प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे.आरोग्यमित्रांची संख्या घटलीयोजनेला सुरुवात झाली त्यावेळी २०१२ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ४५ पीएचसी, ९ ग्रामीण रुग्णालये, ३ उपजिल्हा रुग्णालये या ठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे ५७ आरोग्यमित्र कार्यरत होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या रुग्णाला सदर आरोग्यमित्र या योजनेविषयी माहिती देत होते. त्याचबरोबर त्याला रुग्णालयात भरती करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करत होते. आता मात्र केवळ १६ आरोग्यमित्र कार्यरत आहेत. त्यातही एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, धानोरा येथे आरोग्यमित्र कार्यरत नाही. दुर्गम भागातील नागरिकांना या योजनेविषयी माहिती राहत नाही. त्यांना माहिती देण्याबरोबरच त्यांचे समूपदेशन करण्यासाठी आरोग्यमित्रांची पदे भरणे आवश्यक आहे.आरमोरी, कुरखेडा व अहेरी उपजिल्हा रुग्णालये विमा कंपनीसोबत संलग्न करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविला आहे. रुग्णालय संलग्न करण्याच्या बाबी वरिष्ठस्तरावरून केल्या जातात. नव्यानचे झालेले महिला व बाल रुग्णालयसुद्धा संलग्न करण्यासाठी प्रस्ताव पाठविला जाईल.- डॉ.अनिल रूडे, जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली

टॅग्स :Healthआरोग्य