शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

बिबट चामडे तस्करीचे धागेदोरे तेलंगणपर्यंत

By admin | Updated: April 26, 2017 01:04 IST

आलापल्ली वन विभागांतर्गत कमलापूर वन परिक्षेत्रात कोरेपल्ली गावाजवळ बालाजी गावडे यांच्या शेतात बिबटाच चामडे

तीन आरोपींना अटक : सात लाख रूपयांत करणार होते सौदा, मात्र पाच लाखावरच अडला व्यवहार आलापल्ली : आलापल्ली वन विभागांतर्गत कमलापूर वन परिक्षेत्रात कोरेपल्ली गावाजवळ बालाजी गावडे यांच्या शेतात बिबटाच चामडे असल्याच्या माहितीच्या आधारावर वन विभागाने धाड घालून शेतातील माडंवावर बिबट्याचे चामडे उन्हात वाळत असताना जप्त केले. या प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचे धागेदोरे तेलंगण राज्यापर्यंत पसरले असल्याची शक्यता वन विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणात बालाजी इरपा गावडे, मुकूंदराव बापू सिडाम, लक्ष्मण बापू गावडे या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर बिबट्याला मारणाऱ्या मुख्य आरोपीमध्ये सोमा इरपा गावडे, मल्लूनल्लू कोरके गावडे, कोरके मुक्का गावडे, सुरेश कोरके गावडे या चौघांचा समावेश असल्याचे वन विभागाच्या चौकशीत आढळून आले आहे. आलापल्लीचे उपविभागीय वन अधिकारी आर. एम. अग्रवाल यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कमलापूर वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोरेपल्ली गावाजवळील बालाजी गावडे यांच्या शेतात बिबट्याचे चामडे असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर आलापल्लीचे वन परिक्षेत्राधिकारी किरण पाटील, प्रभाकर आत्राम यांची चमू घटनास्थळी पोहोचली व त्यांनी तपासणी केली. बालाजी गावडेच्या शेतात मांडवावर एका बिबट्याचे चामडे उन्हात वाळत असल्याचे आढळून आले. बिबट्याची कातडी आपल्या ताब्यात घेऊन बालाजीचा शोध सुरू केला. बालाजी पेरमिली गावातील बँकेत गेल्याचे समजले. वन विभागाने आपले पथक पेरमिलीला पाठविले. तेथूनच बालाजीला पकडण्यात आले आणि त्याच वेळेत त्याच्या दोन साथीदारांचा फोन त्याला आला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बालाजीला तू आलापल्लीच्या पेट्रोलपंपावर उभा आहे, असे सांगण्यास सांगितले. त्यानंतर आलापल्लीच्या पेट्रोलपंपावर सापळा रचण्यात आला व तो तेथे येताच बालाजीने दोघांनाही ओळखले व तत्काळ राजाराम खांदला येथील मुकूंद बापू सिडाम याला ताब्यात घेण्यात आले. तेथून वन विभागाचे पथक राजाराम खांदला गावात पोहोचले. लक्ष्मण बापू गावडे यालाही ताब्यात घेण्यात आले. या तिघांची चौकशी केली असता, या संपूर्ण घटनेत कोरेपल्ली गावातील सोमा इरपा गावडे, मल्लूनल्लू कोरके गावडे, कोरके मुक्का गावडे, सुरेश कोरके गावडे या चौघांनी बिबट्याला मारण्यात मुख्य भूमिका बजाविल्याचे त्यांनी सांगितले. अधिक तपास मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक एटबॉन, उपवनसंरक्षक चंद्रशेखर बाला यांच्या मार्गदर्शनात वन अधिकारी करीत आहेत. (प्रतिनिधी) अशी केली बिबटाची शिकार कोरेपल्ली गावाजवळ जंगलातील नाल्यात साचलेल्या पाण्यात विष टाकून बिबट्याला मारण्यात आले. नंतर त्या बिबट्याची संपूर्ण कातडी काढण्यात आली व त्या बिबट्याच्या हाडाचे व मांसाचे तुकडे जंगलात फेकून देण्यात आले. कोरेपल्लीजळील जंगलात मांस व हाड फेकून देण्यात आले व कातडी बालाजी इरपा याच्या शेतात आणण्यात आली व ही बिबटाची कातडी आहे. शेतात ठेव असे सांगितले. कातडी विकण्यासाठी ग्राहक शोधावे लागतील, असेही ठरविण्यात आले. बिबट्याची कातडी विकण्याच्या उद्देशाने या चौघांनी मुकूंद सिडाम व लक्ष्मण गावडे यांच्या मार्फत ग्राहकाचा शोध सुरू केला. त्यांनी तेलंगणा राज्यात एकाशी संपर्क केला व पाच लाख रूपये देण्याचे कबूल केले. मात्र कातडी विकणाऱ्या आरोपींना सात लाख रूपये हवे होते. त्यामुळे सौदेबाजी सुरू होती. त्यात हा व्यवहार अडकला. तेलंगणा राज्यातून कातडी घेणारा कोण होता व आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे, याची माहिती वन विभागाचा पथक घेणार आहे.