शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

भुजबळांचा राजीनामा स्वीकारला नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

By संजय तिपाले | Updated: February 3, 2024 22:11 IST

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावरुन राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झालेले असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही, असा खुलासा केला.

गडचिरोली: अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावरुन राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झालेले असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही, असा खुलासा केला. येथे ३ फेब्रुवारी रोजी  जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित गडचिरोली महोत्सवाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस आले होते. रात्री सव्वानऊ वाजता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भुजबळ यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, याबाबत मुख्यमंत्री अधिक विस्ताराने सांगू शकतील, पण मुख्यमंत्र्यांनी किंवा मी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. 

१६ नोव्हेंंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन १७ नोव्हेंबरला ओबीसी सभेला गेल्याचा गौप्यस्फोट  छगन भुजबळ यांनी अहमदनगर येथील मेळाव्यात ३ फेब्रुवारीला दुपारी केला होता. यावेळी त्यांनी राजीनाम्यावरुन कथित वादग्रस्त विधान केल्याने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावरही निशाणा साधला. शिवाय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारलेला नसल्याचे स्पष्ट केले.  दरम्यान, कथित गोळीबार प्रकरणाने चर्चेत असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याबाबत मात्र त्यांनी भाष्य करणे टाळले.