शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

पावसाअभावी धानरोवणी खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 01:38 IST

मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने कुरखेडा तालुक्यातील पुराडा परिसरातील रोवणीची कामे थांबली आहेत. त्यामुळे यावर्षी सुध्दा धानपीक संकटात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावर्षी पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीला पाऊस अगदी वेळेवर पडला.

ठळक मुद्देपुराडा परिसरातील स्थिती चिंताजनक : रोवलेले धानही करपायला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कपुराडा : मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने कुरखेडा तालुक्यातील पुराडा परिसरातील रोवणीची कामे थांबली आहेत. त्यामुळे यावर्षी सुध्दा धानपीक संकटात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यावर्षी पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीला पाऊस अगदी वेळेवर पडला. त्यामुळे धानाचे पऱ्हे टाकणी व रोवणी धरणे ही कामे अगदी वेळेवर सुरूवात झाली. त्यानंतर मात्र पावसाने उसंत घेतली आहे. मागील १५ दिवसांपासून कुरखेडा तालुक्यात पावसाने दडी मारली असून दिवसा कडक ऊन पडत आहे. धानाची रोवणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. मात्र १५ दिवसांपासून पाऊस झाला नाही. त्यामुळे रोवणीची कामे थांबली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशाच शेतकऱ्यांनी रोवणी केली आहे. ज्या शेतकºयांनी रोवणी केली, अशाही शेतकऱ्यांचे धानपीक संकटात सापडले आहे. धानाच्या बांधीत पाण्याअभावी फटी गेले आहेत. पुन्हा चार ते पाच दिवस पाऊस न होता कडक ऊन शेकल्यास रोवलेले धानपीकही करपण्याची शक्यता आहे. मागील वर्षी धानपिकावर मावा, तुडतुडाने हल्ला केला होता. त्यामुळे हातात आलेले पीक मावा, तुडतुड्याने फस्त केले. यावर्षी तरी चांगले उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र यावर्षी सुध्दा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.उत्पादनात घट निश्चितधान पिकाची रोवणी जेवढी उशिरा होते, तेवढी उत्पादनात घट होते. हा दरवर्षीचा अनुभव आहे. यावर्षी आॅगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र अजूनही रोवणी झाली नाही. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकºयांचे रोवणे झाले आहेत, असेही धान आता पाण्याअभावी करपायला लागले आहे. त्याचाही परिणाम उत्पादनावर होणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस