नगर पंचायत निवडणूक : ६५ उमेदवार आजमाविताहेत भाग्यभामरागड : १७ सदस्य असलेल्या नगर पंचायतीमध्ये अनुसूचित जमातीच्या वाट्याला ११ जागा आल्या असून त्यापैकी ६ जागा महिलांसाठी राखीव आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ५ जागा आरक्षित असून त्यापैकी ३ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातीच्या वाट्याला केवळ १ जागा आली आहे. सर्वसाधारणमध्ये एकही जागा नाही. भामरागड नगर पंचायती अंतर्गत हेमलकसा, ताडगाव, बेजुर, कोयनगुडा, लोकबिरादरी प्रकल्प, दुब्बागुड्डा, हिनभट्टी, मेडपल्ली या गावांचा समावेश होत असून या सर्वच गावांमध्ये प्रचार मोहीम जोरात सुरू आहे. प्रभाग क्र. १ मध्ये राष्ट्रवादी काँगे्रकडून उदय तुकाराम कुळसंगे, काँग्रेसकडून जयराम पापय्या मडावी, मनसेकडून रवी तुलसा सडमेक, भाजपाकडून आनंदराव पापय्या सडमेक हे उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्र. २ मध्ये राष्ट्रवादी काँगे्रसकडून लिला लालसू आत्राम, भाजपाकडून बेबी संभा पोरतेटी, काँग्रेसतर्फे सपना पुंगाटी, मनसेतर्फे सुनीता गोपाल सडमेक उभ्या आहेत. प्रभाग क्र. ३ मध्ये भाजपाकडून संगीता रमेश गाडगे, मनसेतर्फे भिवराबाई विलास कोठारे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कौशल्या विजय सूरजागडे, प्रभाग क्र. ४ मध्ये काँग्रेसकडून निकिता तुळशीराम सडमेक, मनसेतर्फे निर्मला विजय सडमेक, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वनीता दामेधर मडावी, भाजपाकडून अपर्णा उपेंद्र सडमेक उभ्या आहेत. प्रभाग क्र. ५ मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून प्रियंका अशोक कंबगौणीवार, मनसेतर्फे पल्लवी वासुदेव, भाजपातर्फे शालिनी प्रदीप धानोरकर रिंगणात आहेत. प्रभाग क्र. ६ मध्ये मनसेतर्फे चंदा शंकर महक्का, काँग्रेसकडून नलीनी गजानन सडमेक, राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष्मी श्रीकांत मोडक, भाजपाकडून संगीता पीतांबर सडमेक उभ्या आहेत. प्रभाग क्र. ७ मध्ये भाजपाकडून कविता संतोष सिडाम, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अश्विनी प्रभाकर गावडे, काँग्रेसकडून प्रियंका सोमाजी सिडाम, मनसेतर्फे सुनीता राजू मुडम्मा, प्रभाग क्र. ८ मधून भाजपाकडून दिलीप उईके, अपक्ष म्हणून दशरथ विस्तारी मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मज्जी प्रकाश दोगे, काँग्रेसकडून राजू डोलू कुरसामी हे उमेदवार रिंगणात आहेत.प्रभाग क्र. ९ मधून मनसेतर्फे अशोक चिक्का गुडीपाका, भाजपातर्फे चिमन्ना मेंगाजी चालुरकर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे श्रीकांत कैलाश मोडक, काँग्रेसतर्फे शिवराम लिंगा गुडीपाका, प्रभाग क्र. १० मध्ये काँग्रेसकडून ईश्वर शिवलिंगू परसलवार, भाजपातर्फे शंकर सीताराम बडगे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गंगाराम देवू भांडेकर, मनसेतर्फे सूरज वासुदेव येगलोपवार, प्रभाग क्र. ११ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून शारदा अशोक कंबगौणीवार, मनसेतर्फे पल्लवी वासुदेव येगलोपवार, भाजपातर्फे पुष्पा राजेंद्र कोठारे हे उमेदवार रिंगणात आहेत.प्रभाग क्र. १२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून झुरू गिसू आत्राम, मनसेकडून खुशाल ईश्वरशाह मडावी, भाजपाकडून उमेश नारायण मडावी, काँग्रेसतर्फे राजू बंडू वड्डे, प्रभाग क्र. १३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून लिला लालसू आत्राम, काँग्रेसकडून ज्योती चमरू तेलामी, मनसेतर्फे मीना राकेश तलांडे, भाजपातर्फे रंजू बाजीराव, प्रभाग क्र. १४ मध्ये मनसेतर्फे अनिल वासुदेव कुळमेथे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शंकर आत्राम, भाजपातर्फे गिरजा पवन भलावी, काँग्रेसतर्फे विजय मेंगा कुडयामी हे उमेदवार रिंगणात आहेत.प्रभाग क्र. १५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नीलेश मुंशी आत्राम, मनसेतर्फे प्रकाश दानू मडावी, भाजपातर्फे प्रदीप कोरके मडावी, काँग्रेसतर्फे सैनू मादी आत्राम, प्रभाग क्र. १६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे किशोर गंगाराम भांडेकर, भाजपातर्फे संजय पोचन्ना पडलवार, काँग्रेसतर्फे हरिदास संभाजी रापेल्लीवार, प्रभाग क्र. १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निला कोपा आत्राम, काँग्रेसतर्फे धनश्री रघुनाथ मांजी, भारतीय जनता पार्टीतर्फे रूक्मीनी विनोद मडावी, मनसेतर्फे लता नारायण मडावी, हे उमेदवार रिंगणात आहेत. (तालुका प्रतिनिधी)धानोरात सात प्रभागांत ३५ उमेदवार रिंगणातधानोरा नगर पंचायतीच्या प्रभाग क्र. १ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कनिजा इसाक शेख, अपक्ष उमेदवार म्हणून गडपायले सुनील तुळशिराम, घनश्याम श्रीराम राऊत, भाजपातर्फे धाईत सुभाष गिरीधर, कॉग्रेसतर्फे पठाण इरफान बब्बुखॉ, अपक्ष उमेदवार प्रदीप केशव सूर्यवंशी, शिवसेनेतर्फे सोमनकर अर्जुन आत्माराम हे निवडणूक लढवित आहेत. प्रभाग क्र. ३ मध्ये अपक्ष उमेदवार देवेंद्र आनंद देवीकर, भैसारे ममता रेमाजी, मारभते भास्कर आडकुजी, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वकील अहमद जमील अहमद पठाण, भाजपातर्फे विनोद रामभाऊ निंबोरकर, काँग्रसेतर्फे शेख अकबर पीरमोहम्मद रिंगणात आहेत. प्रभाग क्र. ४ मध्ये अपक्ष उमेदवार कांबळे देवानंद राजू, भाजपाकडून गनोरकर महादेव मोतीराम, काँग्रेसतर्फे नाकतोडे रमेश मारोतराव, अपक्ष उमेदवार बोडगेवार नरेश राजाराम, मोहुर्ले कालिदास विठ्ठलराव हे उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्र. ८ मध्ये काँग्रेसकडून गुरनुले गजानन नेवाजी, शिवसेनकडून गोविंदा गजानन चौधरी, अपक्ष उमेदवार बरच्छा ललीत धरमसी, भाजपातर्फे भास्कर विश्वनाथ सोनुले निवडणूक लढवीत आहेत. प्रभाग क्र. १२ मध्ये काँग्रेसकडून देवानंद मुक्काजी भेंडारे, शिवसेनकडून बोडगेवार संदीप मारोती, भाजपाकडून भोयर गजानन केशव, अपक्ष उमेदवार गुरनुले गणपत विश्वनाथ, सहारे प्रमोद नंदू निवडणूक लढवीत आहेत. प्रभाग क्र. १३ मध्ये काँग्रेसतर्फे अवदेश भोंदूजी नरोटे, भाजपाकडून परचाके गजानन संभाजी, अपक्ष उमेदवार मडावी विनोद नामदेव निवडणूक लढवीत आहेत. प्रभाग क्र. १४ मध्ये अपक्ष उमेदवार उंदीरवाडे कृष्णराव नाजुकराव, म्हशाखेत्री कपीलदेव देवनाथ, राष्ट्रवादी काँग्रेसकडून चन्नेवार अमोल भास्कर, काँग्रेसकडून भैसारे भूपेंद्र शिवकुमार, भाजपाकडून म्हशाखेत्री अनिल ऋषी निवडणूक लढवित आहेत.
भामरागडात प्रचार शिगेला
By admin | Updated: October 26, 2015 01:31 IST