शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी तालुक्यातील ५९ निराधार व ज्येष्ठ नागरिकांना सानुग्रह अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 16:04 IST

दीड हजार रुपये अर्थसहाय्य : छाननीनंतर समितीने पात्र लाभार्थ्यांचे अर्ज केले मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : येथील संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत निराधार योजनेची ५९ प्रकरणे मंजूर करण्यात आली. ज्यांचे प्रकरण मंजूर झाले आहे. त्यांना मासिक दीड हजार रूपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. 

निराधार, वृद्ध, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त तसेच निराधार विधवा, परित्यक्ता, देवदासी महिला, अनाथ बालके, इत्यादींचे जीवन सुसह्य करण्यासाठी त्यांना विहीत योजनेच्या माध्यमातून मासिक अर्थसाहाय्य देण्यात येते. त्याअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति महिना १ हजार ५०० रूपये अनुदान वाटप करण्यात येते. 

आरमोरी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची सभा तहसील कार्यालयाच्या सभागृहात, समितीचे अध्यक्ष नंदू पेट्टेवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला तिजेंद्र गरमडे, प्रेमिता महेंद्र सने, महेश बुल्ले, दीपक निंबेकर, तहसीलदार उषा चौधरी, गटविकास अधिकारी मंगेश, नायब तहसीलदार डी. एम. वाकुलकर, अव्वल कारकून ए. एम. नन्नावरे, महसूल सहायक जे. पी. गुरनुले, आरेवार उपस्थित होते.

बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेची २३ प्रकरणे, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेची २२, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेची ९, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेची ५, अशी एकूण ५९ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. त्यांना मदत मिळेल. 

मानधन वाढीची अपेक्षा म्हातारपणात कोणतेही काम करणे शक्य होत नाही. मात्र वाढत्या वयाबरोबर आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. औषध गोळ्यांवर बराच पैसा खर्च होते. शासन केवळ दीड हजार रूपये देते. ते पुरेसे नाहीत, त्यात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.

निराधारांनो, व्यवस्थित अर्ज करा अनेक नागरिक योजनेसाठी पात्र राहतात. मात्र ते व्यवस्थित अर्ज करीत नाही. आवश्यक कागदपत्रे नसल्याने अर्ज प्रलंबित ठेवला जातो. दुसरी सभा होईपर्यंत त्याला आर्थिक सहाय्य मिळत नाही. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावित असे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली