शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

मृतकाच्या वारसदारांना मिळाले दोन लाख रूपये

By admin | Updated: August 13, 2015 00:28 IST

प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा चामोर्शी येथील खातेदार शालिनी गजानन दुधबावरे यांनी केवळ १२ भरून स्वत:चा विमा काढला होता.

चामोर्शी : प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा चामोर्शी येथील खातेदार शालिनी गजानन दुधबावरे यांनी केवळ १२ भरून स्वत:चा विमा काढला होता. दुर्दैवाने शालिनी दुधबावरे हिचा स्वयंपाक करताना जळाल्याने मृत्यू झाला. ग्रामीण बँकेने विमा कंपनीकडे संबंधित खातेदाराच्या वारसदारांना विम्याच्या रकमेचा लाभ देण्यात यावा, असा दावा सादर केला. विमा कंपनीने सदर दावा मंजूर केल्यानंतर मृतकाचे वारसदार गजानन उष्टू दुधबावरे याला दोन लाख रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.भाजप प्रणीत केंद्र सरकारद्वारे घोषित सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जीवन सुरक्षा व जीवन ज्योती विमा योजना विदर्भ कोकण ग्रामीण बँकेद्वारे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविल्या जात आहेत. प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेची माहिती मिळाल्यानंतर चामोर्शी येथील शालिनी गजानन दुधबावरे यांनी जीवन सुरक्षा विमा योजनेचे खाते उघडले.खातेदार शालिनी गजानन दुधबावरे ही घरी स्वयंपाक करताना जळून तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा चामोर्शीचे शाखाधिकारी हबीब सय्यद यांना मिळाली. त्यांनी तत्काळ गजानन दुधबावरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सात्वन केले. तसेच प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेची माहिती देऊन आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. त्यानुसार दुधबावरे कुटुंबीयांनी सर्व आवश्यक कागदपत्रे ४ जुलै २०१५ रोजी शाखा व्यवस्थापकाकडे सादर केले. सदर कागदपत्र जोडून शाखा व्यवस्थापक दि न्यू इंडिया इन्शुरन्स या विमा कंपनीकडे दावा सादर केला. कंपनीने दावा मंजूर केल्यानंतर विम्याचे दोन लाख रूपये ग्रामीण बँकेकडे जमा झाले. त्यानंतर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक हबीब सय्यद यांनी ७ जुलै रोजी शुक्रवारला कुरूड येथील बँकेच्या अति लघु शाखेत मृतकाचे वारसदार गजानन दुधबावरे यांना प्रदान केला. यावेळी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी एस. जी. खत्री, दिलीप काशिनाथ चलाख, कुरूडचे उपसरपंच रमेश सातपुते, ग्रा. पं. सदस्य बाबुराव शेंडे, ग्रामसेवक प्रधान आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते.विदर्भ कोकण ग्रामीण बँकेद्वारे भारत सरकारच्या विमा योजनेची माहिती गावागावात जाऊन दिली जात आहे. सदर घटनेमुळे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची सामाजिक बांधिलकी जनतेसमोर आली आहे. याअनुभवातून योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी आपले भविष्य सुरक्षित करावे, तसेच आयुष्य सुरक्षित करणाऱ्या व म्हातारपणाची सोय म्हणून नागरिकांनी अटल पेंशन योजनेचाही लाभ घ्यावा. यासाठी ग्रामीण बँकेच्या कोणत्याही शाखेशी नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक श्रीधर नार्लावार यांनी यावेळी केले. (शहर प्रतिनिधी)विरोधी पक्षांच्या नेत्यांना बसली चपराककेंद्रात भाजप-शिवसेना युतीची सरकार स्थापन झाल्यानंतर प्रधानमंत्री पदाची सूत्रे नरेंद्र मोदी यांनी स्वीकारली. त्यांनी अनेक नाविण्यपूर्ण कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. दरम्यान विरोधी पक्षातील नेते पंतप्रधानांच्या साऱ्याच योजना सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आहेत, अशी टीका केली होती. मात्र प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत खातेदाराच्या वारसदारास लाभ मिळाल्यामुळे टीका करणाऱ्या या नेत्यांना चांगलीच चपराक बसली आहे.