काँक्रिट रस्ता कामाचे भूमिपूजन : नंदीगावात जि. प. उपाध्यक्षांच्या उपस्थितीत कार्यक्रम गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत देवलमरी अंतर्गत येत असलेल्या नंदीगाव येथे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधण्यात येणार आहे. या रस्ता कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला अहेरी पंचायत समितीच्या सभापती सुरेखा आत्राम, उपसभापती राकेश तलांडे, जि. प. सदस्य अजय नैताम, पं. स. सदस्य योगेश्वरी मोहुर्ले, भास्कर तलांडे, तिमरनचे सरपंच महेश मडावी, ग्रा. पं. सदस्य प्रफुल नागुलवार, राजाराम ग्रा. पं. चे सदस्य संजय पोरतेट आदींसह हरीश गावडे, प्रमोद मडावी, लालू चालुरकर, संदीप दुर्गे, बंडू दुर्गे आदी उपस्थित होते. तसेच झिमेला येथे हनुमान मंदिरात जयंती कार्यक्रम जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सामूहिक विवाह सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पाच जोडप्यांचे लग्न लावून देण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर) कंकडालवार यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अजय कंकडालवार यांच्यासह नवनिर्वाचित जि. प. व पं. स. सदस्यांचा गुड्डीगुडम ग्राम पंचायतमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी अजय कंकडालवार यांना शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात जि. प. सदस्य अजय नैताम, पं. स. सभापती सुरेखा आत्राम, उपसभापती राकेश तलांडे, पं. स. सदस्य भास्कर तलांडे, योगेश्वरी मोहुर्ले यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सरपंच महेश मडावी यांनी अजय कंकडालवार यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला उपसरपंच पेंदाम, प्रफुल नागुलवार, रमाकांत पेंदाम, शोभा आणेपाकला आदी उपस्थित होते.
दलित वस्ती सुधार योजनेच्या कामाला सुरुवात
By admin | Updated: April 13, 2017 02:38 IST