लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात मुख्य दहा नद्या वाहत असून जिल्हा भौगोलिकदृष्टया ४२० किलोमिटर लांबीत विस्तारलेला आहे. पावसाचे सरासरी पर्जन्यमान १ हजार ४०० मिमी असल्यामुळे आणि सर्व उपनद्या मुख्य नद्यांशी जोडत असल्यामुळे पावसाळयात बऱ्याचदा दळणवळण बंद होते. यामध्ये गावाकडे जाण्याच्या घाईत पुलावरुन पाणी असतांनाही नागरिक पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात व मृत्यू ओढवून घेतात. या सर्व बाबींना निर्बंध करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत गाव, तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी यंत्रणा कार्यरत आहे. तेव्हा नागरिकांना सुरक्षित व संरक्षित ठेवण्यासाठी यंत्रणेत काम करणाºयांमध्ये समन्वयाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल यांनी केले.यावर्षीच्या पावसाळ्यात उद्भवणाºया नैसर्गिक आपत्तीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना व आराखडा तयार करण्यासाठी मान्सूनपूर्व आढावा बैठक सोमवारी नियोजन विभागाच्या सभागृहात आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे, नियोजन अधिकारी तेजबहादुर तिडके, उपस्थित होते. बैठकीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी यांनी सादरीकरणाव्दारे जिल्ह्यातील उद्भवणाºया धोक्यांसंदर्भात माहिती सांगितली. यामध्ये अतिवृष्टी, वज्राघात, पूर, बोट अपघात, साथरोग, औषधांचा तुटवडा, धोकादायक तलावे, इमारती, कार्यालये, कमी उंचीच्या पुलामुळे वाहतूक खंडीत होणे, गोसेखुर्द, इटियाडोह, वर्धा प्रकल्प, श्रीरामसागर यातुन सोडणारे पाणी/ विसर्ग, विद्युत पुरवठा खंडित होणे, दुरध्वनी, मोबाईल व इंटरनेट सुविधा विस्कळीत होत असते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी म्हणाले, या सर्व आपत्तीमध्ये सापडलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी प्रशिक्षीत पथके गाव, तालुका, जिल्हा पातळीवर तयार करण्यात आले आहेत. ही पथके आपले कर्तव्य एक सामाजिक दायीत्व असल्याची भावना ठेवून केल्यास होणाºया संभाव्य नुकसानीची तीव्रता कमी करता येईल. या बैठकीत सर्व विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद व नं. प. चे मुख्याधिकारी उपस्थित होते. यावेळी पावसाळ्यातील आपत्ती निवारणावरील उपाययोजनांवर चर्चा झाली.
समन्वयातून आपत्तीवर मात करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:42 IST
जिल्ह्यात मुख्य दहा नद्या वाहत असून जिल्हा भौगोलिकदृष्टया ४२० किलोमिटर लांबीत विस्तारलेला आहे. पावसाचे सरासरी पर्जन्यमान १ हजार ४०० मिमी असल्यामुळे आणि सर्व उपनद्या मुख्य नद्यांशी जोडत असल्यामुळे पावसाळयात बऱ्याचदा दळणवळण बंद होते.
समन्वयातून आपत्तीवर मात करा
ठळक मुद्देशांतनू गोयल यांच्या सूचना : गडचिरोलीत मान्सूनपूर्व आढावा बैठक