शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

ज्येष्ठांच्या तणावमुक्तीचे केंद्र व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 6:00 AM

सदर विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मोकळा श्वास घेता येणार आहे. यानिमित्ताने ज्येष्ठांसाठी मनोेरंजनाचे साधन उपलब्ध झाले आहे. याचा लाभ शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन खा.अशोक नेते यांनी केले. खासदार अशोक नेते यांच्या स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपये व आमदार डॉ.देवराव होळी यांच्या विकास निधीतून तीन लाख अशा एकूण १३ लाख रुपयांच्या निधीतून सदर विरंगुळा केंद्र उभारण्यात आले.

ठळक मुद्देखासदारांचे प्रतिपादन : ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आजच्या धकाधकीच्या युगात ज्येष्ठ नागरिकांना जीवन जगणे अडचणीचे झाले आहे. आपल्या मुलांपासून दूर राहून त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागते, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेले हे विरंगुळा केंद्र मानसिक समाधान देणारे तसेच तणावमुक्तीचे केंद्र ठरावे, असे प्रतिपादन खा.अशोक नेते यांनी केले.ज्येष्ठ नागरिक संस्था गडचिरोलीच्या वतीने स्थानिक पोटेगाव मार्गावर ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र तयार करण्यात आले. या विरंगुळा केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ.देवराव होळी, नगर पालिकेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, न.प.च्या शिक्षण सभापती रितू कोलते, पाणीपुरवठा सभापती वैष्णवी नैताम, सभापती लता लाटकर, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष डी.एम.बर्लावार, संघटनेचे चंद्रपूर येथील प्रादेशिक अध्यक्ष विजय चंदावार, सचिव संगीडवार, देवाजी सोनटक्के आदी उपस्थित होते.सदर विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मोकळा श्वास घेता येणार आहे. यानिमित्ताने ज्येष्ठांसाठी मनोेरंजनाचे साधन उपलब्ध झाले आहे. याचा लाभ शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन खा.अशोक नेते यांनी केले.खासदार अशोक नेते यांच्या स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपये व आमदार डॉ.देवराव होळी यांच्या विकास निधीतून तीन लाख अशा एकूण १३ लाख रुपयांच्या निधीतून सदर विरंगुळा केंद्र उभारण्यात आले. याप्रसंगी आमदार डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संस्थेचे पांडुरंग घोटेकर यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Ashok Neteअशोक नेतेDevrao Holiदेवराव होळी