शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बीडीएस प्रणाली ठप्प : शिक्षकांची हक्काची ठेव अडकली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 18:27 IST

बीडीएस प्रणाली महिनाभरापासून बंद : जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी सापडले संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यभरातील शिक्षकांसाठी कार्यरत असलेली बीडीएस (बिल डिस्काउंटिंग सिस्टम) प्रणाली गेल्या महिनाभरापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन हजारांवर शाळांमधील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्काची ठेव रक्कम अडकून पडली असून, त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

गेल्या महिन्यापासून ही प्रणाली पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा थेट परिणाम शिक्षकांच्या आर्थिक व्यवहारांवर होत असून, आता गरज भासल्यावर त्यांनी पतसंस्था किंवा इतर बँकांकडे जास्त व्याजदराने कर्ज घेणे सुरू केले आहे. शहरी व ग्रामीण भागात राहणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणर्णीचा सामना करावा लागत आहे.

काय आहे बीडीएस यंत्रणाशिक्षकांनी आपल्या पगारातून नियमितपणे वजा करून बीडीएस योजनेत ठेव रक्कम गुंतवलेली असते. बीडीएस प्रणालीच्या माध्यमातून शाळा, शिक्षण संस्था तसेच सहकारी बँका यांच्यामार्फत शिक्षकांना परतावा आणि नापरतावा या तत्त्वावर पैसे मिळतात.

मुला-मुलींचे लग्न झाले तरीही पैसे मिळेनाशिक्षकांच्या मुलामुलींचे लग्न झाले. लग्नकार्यासाठी मोठा खर्च आला. मात्र, हक्काची ठेव रक्कम मिळाली नाही. तसेच घर बांधकाम, मुलांचे शिक्षणासाठी पैसे लागतात.

कर्जाने पैसे काढण्याची पाळीअसल्याने शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत असून, गरजेच्या वेळी आपलेच पैसे मिळवण्यासाठी त्यांना व्याजाने कर्ज घ्यावे लागत आहे. शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन ही प्रणाली पुन्हा सुरू करावी, अशी मागणी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केली जात आहे.

यंत्रणेत तांत्रिक बिघाडबीडीएस प्रणालीत अडथळा का निर्माण झाला याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड आहे की निधी अभावामुळे प्रणाली थांबवण्यात आली आहे, याबाबत अनभिज्ञता आहे. बीडीएस प्रणाली सुरू होणार तरी कधी? असा सवाल शिक्षक व कर्मचारी करीत आहेत.

साहेब प्रणाली सुरू होणार तरी कधी ?राज्य शासन किंवा शिक्षण विभागाकडून बीडीएस प्रणाली सुरू होणार असल्याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. राज्यस्तरावर निर्णय प्रक्रियेत असून आर्थिक विभाग व संबंधित बँक यांच्यातील समन्वयातून ही प्रणाली पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ठोस तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. अलिकडे शिक्षक वेगवेगळ्या पेन्शन योजनेत आपल्या वेतनातून विशिष्ठ रक्कम गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे बीडीएस प्रणालीत शिक्षकांचा फारसा सहभाग असल्याचे दिसून येत नाही. 

"शिक्षक व कर्मचाऱ्यांचे यापूर्वी पैसे निघाले आहेत. सध्यातरी कार्यालय स्तरावर बीडीएस प्रणालीबाबत तक्रारी नाहीत."- वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी, माध्य.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली