शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
2
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
3
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
4
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
5
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
6
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
8
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
9
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
10
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
11
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
12
भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
13
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
14
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
15
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
16
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
17
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
18
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
19
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
20
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स

कर्जमुक्ती याेजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका शेतकऱ्यांवर मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 05:00 IST

खरीप व रब्बी दाेन्ही हंगामासाठी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. राज्य शासनाच्या पंजाबराव देशमुख पीककर्ज याेजनेंतर्गत हे कर्ज बिनव्याजी राहते. त्यासाठी संबंधित कर्ज ३१ मार्चपूर्वीच भरणे आवश्यक आहे. मात्र, सततच्या नापिकी व इतर संकटांमुळे शेतकरी कर्ज भरू शकत नाही. थकीत कर्जदाराला बॅंका पुन्हा नव्याने कर्ज देत नाही. 

ठळक मुद्देमागील वर्षी ३५ हजार शेतकऱ्यांनी उचलले कर्ज

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मागील काही वर्षांमध्ये पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटत चालली हाेती. मात्र, राज्य शासनाने कर्जमुक्ती याेजना राबवून थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. त्यामुळे मागील वर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. सुमारे ३५ हजार १५ शेतकऱ्यांना १६२ काेटी ३८ लाख रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. खरीप व रब्बी दाेन्ही हंगामासाठी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. राज्य शासनाच्या पंजाबराव देशमुख पीककर्ज याेजनेंतर्गत हे कर्ज बिनव्याजी राहते. त्यासाठी संबंधित कर्ज ३१ मार्चपूर्वीच भरणे आवश्यक आहे. मात्र, सततच्या नापिकी व इतर संकटांमुळे शेतकरी कर्ज भरू शकत नाही. थकीत कर्जदाराला बॅंका पुन्हा नव्याने कर्ज देत नाही. भाजप शासनाने २०१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजना राबविली. या याेजनेंतर्गत २००९ ते २०१६ या कालावधीतील थकीत कर्ज माफ केले. मात्र, प्रत्यक्षात कर्जमाफीची रक्कम मिळण्यास उशीर झाला, तसेच २०१६ नंतरचेही कर्ज माफ हाेईल, या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी पीककर्ज भरले नाही. थकीत कर्जदारांची संख्या वाढतच गेली. त्यामुळे २०१७ ते २०२० या कालावधीत कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून येते. त्यानंतर, पुन्हा विद्यामान राज्यशासनाने २१ डिसेंबर, २०१९ राेजी महात्मा फुले कर्जमुक्ती याेजनेची घाेषणा केली. या याेजनेंतर्गत पुन्हा ३० सप्टेंबर, २०१९ पर्यंत थकीत असलेले कर्ज माफ केले. या दाेन्ही याेजनांतर्गत अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाल्याने, २०२०-२१ या आर्थिक वर्षात कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून कर्जाची उचल करण्याचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. मात्र कर्ज फेडीत ते आघाडीवर आहेत.

या वर्षीही कर्जदार वाढणार काही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम अगदी दाेन महिन्यांपूर्वी जमा झाली आहे. त्यामुळे हे शेतकरी मागील वर्षी कर्ज घेण्यासाठी पात्र ठरले नव्हते. हे शेतकरी आता या वर्षी कर्ज उचलण्यासाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा या वर्षी कर्ज उचलणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

चार वर्षे लांबली कर्जमुक्ती याेजनाराज्य शासनाने दाेन कर्ज मुक्ती याेजना राबविल्या. पहिली याेजना २०१६ मध्ये, तर दुसरी याेजना २०१९ मध्ये राबविली. मात्र, प्रत्यक्षात पैसे मिळण्यास २०२० उजाडला आहे. शासनाकडून बँकांना पैसे मिळाल्याशिवाय बँका शेतकऱ्याची कर्जमुक्ती करीत नाहीत, तसेच त्याला नवीन कर्जही देत नाही. नियमित भरणाऱ्यांचे कर्ज माफ हाेणार नाही. अशा अटी शासनाने घातल्या असल्या, तरी आपलेही कर्ज माफ हाेईल. या अपेक्षेने काही नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांनीही कर्ज भरले नाही. त्यामुळे २०१६ ते २०२० पर्यंत पीककर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटली असल्याचे दिसून येते. 

कर्जमुक्तीची घाेषणा केल्यानंतर, प्रत्यक्षात दाेन वर्षांनी कर्ज माफ झाले. मध्यंतरीच्या कालावधीत कर्ज घेता आले नाही. मागील वर्षी  कर्ज माफ झाल्याने नवीन कर्जाची उचल करण्यात आली आहे. या वर्षी कर्जाचा भरणा करून नवीन कर्ज उचलू. देवाजी तलांडे, शेतकरी

महात्मा फुले कर्जमुक्ती याेजनेचे पैसे दाेन महिन्यांपूर्वी जमा झाले. त्यामुळे आता आपण कर्जमुक्त झालाे आहाेत. या वर्षी आता आपण कर्ज उचलू. कर्जमुक्ती झाल्यामुळे कर्जाचे संकट दूर झाले आहे. शिवराम चहांदे, शेतकरी 

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक