गडचिराेली : बंजारा समाजाचा हळदी-कुंकू स्नेहमिलन साेहळा समाजाचे नायक तथा ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेश सचिव गाेवर्धन चव्हाण यांच्या निवासस्थानी रविवारी पार पडला.
स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध मनाेरंजनात्मक खेळाचे आयाेजन व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर महिलांनी भेटवस्तूंची देवाण-घेवाण केली. लेखक भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेल्या एका कादंबरीत बंजारा समाजातील परंपरा व चालीरीतींबाबत अश्लील शेरेबाजी केली आहे, असा आराेप करीत त्यांचा निषेध नाेंदविण्यात आला. या कार्यक्रमाला गीता चव्हाण, प्रीती पवार, वनिता राठाेड, शीतल राठाेड, मुक्ता जाधव, छाया राठाेड, साेनाली राठाेड, सुरेखा राठाेड, पुष्पा चव्हाण, जयश्री पवार, अहिल्या चव्हाण, माधुरी आडे, शाेभा जाधव, बबीता राठाेड, कविता जाधव, माधुरी चव्हाण, शिल्पा चव्हाण, प्रणिता चव्हाण, वैशाली राठाेड, शाेभा भुसे, राणी राठाेड, शाेभा राठाेड, कल्पना चव्हाण, वैशाली राठाेड, सपना राठाेड उपस्थित हाेत्या. संचालन प्रीती पवार तर आभार वनिता राठाेड यांनी मानले.