सिराेंचा शहरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असून त्यावर उपाय म्हणून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून हवे तसे सहकार्य मिळत असले तरी दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यावर उपाय म्हणून सिरोंचा शहर व परिसरात तहसीलदार सय्यद हमीद, नायब तहसीलदार प्रकाश पुप्पलवार, मुख्यधिकारी विशाल पाटील यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कन्नाके हे आपल्या टीमसोबत उपस्थित राहून शहरातील विविध भागात जाऊन कोविडबाबत घरोघरी जाऊन चाचणी करीत आहेत. नागरिकसुध्दा हवे तसे सहकार्य करीत आहेत. व्यक्ती कोविडबाधित असल्यास शहरातील विविध भागातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
===Photopath===
200421\20gad_1_20042021_30.jpg
===Caption===
नागरिकांचे लसीकरण करताना आराेग्य विभागाचे कर्मचारी