१८ केंद्र : शिक्षक मतदारसंघ निवडणूक गडचिरोली : विधान परिषदेच्या नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी गडचिरोली जिल्ह्यात एकूण १८ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया घेण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात एकूण सरासरी ८८.४३ टक्के मतदान झाले आहे. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात २ हजार ६२५ पुरूष व ४५१ महिला मतदार असे एकूण ३ हजार ७६मतदार होते. यापैकी २ हजार ७१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानांची अंतिम टक्केवारी ८८.४३ आहे. जिल्ह्यातील १८ मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडली. सिरोंचा येथे ८२.१०, एटापल्ली ९०.३२, अहेरी ८६.५७, आलापल्ली ८६.७०, भामरागड १००, आष्टी ८६.७२, चामोर्शी ९१.७८, अंकिसा ९१.४८, मुलचेरा ८९.२४, गडचिरोली ८५.३४, धानोरा ८४.५७, कोरची ८२.१३, देसाईगंज ९३.७३, आरमोरी ९३.२७, अमिर्झा ९५.३८, वडधा ९०.००, कढोली ९२.००, कुरखेडा येथील मतदान केंद्रावर ८६.४६ टक्के मतदान झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात ८८.४३ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या मतपेट्या नागपूर येथील विभागीय कार्यालयात नेल्या जाणार आहे व नागपूर येथेच याची मतमोजणी सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्ह्यात सरासरी ८८.४३ टक्के मतदान
By admin | Updated: February 4, 2017 02:03 IST