शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीत व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न फसला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 01:20 IST

शहरात आलापल्ली मार्गावर दुकान बंद करून दुचाकीने जात असलेल्या व्यापाºयास लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना काल २ आॅक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : शहरात आलापल्ली मार्गावर दुकान बंद करून दुचाकीने जात असलेल्या व्यापाºयास लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना काल २ आॅक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ निर्माण झाली आहे.   येथील अनिल पान मटेरियलचे मालक श्रीनिवास राघमवार हे आपले दुकान बंद  करून नेहमीप्रमाणे गोडाऊनकडे जात असताना रात्री ८.३०  वाजता आलापल्ली मार्गावरील ग्रामीण रुग्णालयासमोर दबा धरून बसलेल्या दोन हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनी त्यांच्या दुचाकिला मागून ठोस मारली.  त्यामुळे राघमवार यांनी कोण आहे म्हणून मागे फिरले असता त्यांची पैशाची बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न आरोपी करू लागले. तसेच एकाने तोंडावर स्प्रे मारला.  त्यामुळे राघमवार यांना इजा झाली. ते वेदनेने खाली पडले आणि जोरात ओरडू लागले. त्यानंतर आरोपी आलापल्ली मार्गाने पळून गेले. यावेळी काही नागरिकांनी पाठलाग केला पण ते  सापडले नाही.  त्यांच्या दुचाकीच्या नंबर प्लेटला पट्टी चिटकवून होती.  त्यामुळे नंबर सुध्दा मिळू शकला नाही.  श्रीनिवास राघमवार याना तत्काळ उपचारासाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. राघमवार यांनी दाखविलेल्या हिमतीमुळे मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे आष्टी मधील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी