शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
2
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
3
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
4
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
5
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
6
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
7
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
8
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
9
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
10
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
11
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
12
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
13
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
14
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
15
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
16
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
17
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
18
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
19
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!

चार हजारांची लाच घेणारा सहायक लेखाधिकारी जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 7:09 PM

एका निवृत्त महिला कर्मचाºयाची पेंशन केस मंजूर करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडचिरोली जिल्हा

गडचिरोली : एका निवृत्त महिला कर्मचाºयाची पेंशन केस मंजूर करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडचिरोली जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील सहायक लेखाधिकारी रवींद्र देवतळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाºयांनी अटक केली. ही कारवाई गुरूवारी (दि.२१) दुपारी करण्यात आली.एसीबीकडून प्राप्त माहितीनुसार, तक्रारकर्ती महिला ही जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात कार्यरत होती. प्रकृती बरी राहात नसल्यामुळे तिने स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यामुळे पेन्शन केस सादर करण्यात आली. ती वरिष्ठांकडे सादर करून मंजूर करून घेण्यासाठी सहायक लेखाधिकारी देवतळे याने ५ हजार रुपयांची मागणी केली. परंतू तडजोडीअंती ४ हजारात काम करण्याचे देवतळे याने कबूल केले.दरम्यान तक्रारकर्त्या महिलेच्या गुजरात राज्यात मजुरीचे काम करणाºया मुलाने या प्रकाराची तक्रार एसीबीकडे केली. या विभागाच्या अधिकाºयांनी गुरूवारी (दि.२१) जिल्हा परिषद कार्यालयासमोरील हॉटेलमध्ये सापळा रचला. तिथे तक्रारकर्त्या महिलेच्या मुलाकडून लाचेची रक्कम स्वीकारताना देवतळे याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, १३ (१) (ड), सहकलम ३२ (२) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, उपअधीक्षक डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवी राजुलवार, एम.एस.टेकाम, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, सत्यम लोहंबरे, रवींद्र कत्रोजवार, सुधाकर दंडिकवार, महेश कुकुडकार, गणेश वासेकर, सोनल आत्राम, सोनी तावाडे, तुळशीदास नवघरे, घनश्याम वडेट्टीवार यांनी यशस्वी केली.