जिल्हास्तरावर व इतर ११ तालुक्यांमध्ये पूर्णवेळ कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नॅशनल अर्ली वॉर्निंग स्कोरद्वारे रुग्णावर कशाप्रकारे व कोणत्या ठिकाणी उपचार केले जातील याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. सदर गुणांकानुसार प्रत्येक रुग्णाला गृहविलगीकरण, कोविड केअर सेंटर किंवा जिल्हा रुग्णालय यापैकी एका ठिकाणी उपचारासाठी पाठविले जाईल. यामुळे गरजू रुग्णांना सोप्या पद्धतीने बेड उपलब्ध होईल व त्यांच्यावर योग्य उपचार होतील. कोरोना रुग्णांची जबाबदारी बेड क्रमांकानुसार त्या त्या ठिकाणच्या यंत्रणेवर दिली आहे. यामध्ये सर्व तालुक्यातील उपलब्ध बेड्सला क्रमांक देण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित आस्थापनेवरील वेगवेगळे डॉक्टर्स, नर्स, वाॅर्ड बॉय, ड्रायव्हर यांना दोन शिफ्टमध्ये आपल्या रुग्णांची काळजी घेणे बंधनकारक असणार आहे. यामध्ये कोविड केअर सेंटर्स, डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटर्स, डिस्ट्रिक्ट कोविड हॉस्पिटल बेड्स प्रत्येक डॉक्टर्सच्या टीमला वाटप करून देण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हास्तरावरील डिस्ट्रिक्ट कोविड हॉस्पिटलची क्षमता ४१७, डेडिकेटेट कोविड सेंटर यामध्ये गडचिरोली धर्मशाळा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, आरमोरी व कुरखेडा या ठिकाणची क्षमता ३२९ आहे, तर कोविड केअर सेंटर्स प्रत्येक तालुक्यात आहेत. त्याठिकाणी १२५१ बेड्सची क्षमता आहे. या सर्व १९५७ बेड्सच्या सनियंत्रणासाठी जबाबदारींचे आरोग्य कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.
बाॅक्स
नॅशनल अर्ली वॉर्निंग स्कोर
कोरोनाबधिताला कोणत्या प्रकारे उपचार द्यावेत, त्यांचे सनियंत्रण कसे करावे व त्याला कोणत्या ठिकाणी उपचार करावेत याचे उत्तर या नॅशनल अर्ली वॉर्निंग स्कोरद्वारे ठरविण्यात येणार आहे. या पद्धतीत रुग्णाची ऑक्सिजन पातळी, बाह्य ऑक्सिजन पुरवठा, रक्तदाब, हृदयाचे ठोके, बाह्य लक्षणे, तापमान अशा बाबी तपासून गुणांकन निश्चित केले जाणार आहे.
बाॅक्स
नियंत्रण कक्षातून मिळणार मदत
जिल्हा स्तरावर कोरोनाबाबत नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी गृहविलगीकरणातील रुग्णांना मदत मिळणार आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांना बेड मिळण्यासाठीचे तपशील या ठिकाणी दिले जाणार आहेत. या कोरोना नियंत्रण कक्षामध्ये सद्या फक्त बेड्सची उपलब्धता व गृहविलगीकरणाविषयी माहिती दिली जाणार आहे. यासाठी २२२०३०, २२२०३५, २२२०३१ ह्या क्रमांकावर संपर्क करता येईल.