शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
3
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
4
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
5
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
6
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
7
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
8
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
9
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
10
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
11
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
12
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
13
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
14
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
15
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
16
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
17
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
18
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
19
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
20
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास

निवडणुकीपूर्वीच घातपाताचा कट, पाच नक्षल्यांचा खात्मा

By संजय तिपाले | Updated: October 21, 2024 18:36 IST

Gadchiroli : छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलात चकमक: एक जवान जखमी, गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई

गडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा नक्षल्यांचा डाव उधळून लावण्यात येथील पोलिसांना २१ ऑक्टोबरला यश आले. माओवादी व जवानांत छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलात जोरदार चकमक उडाली. यात पाच नक्षल्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. चकमकीत एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

गडचिरोली पोलिसांनी माओवादविरोधी अभियान प्रभावीपणे राबविल्यामुळे नक्षल्यांना जबर हादरा बसला आहे. अनेक जहाल माओवादी चकमकीत ठार झाले तर काहींनी शरणागती पत्करली. त्यामुळे माओवादी चळवळ खिळखिळी झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नक्षलवादी घातपात करु शकतात, ही शक्यता गृहित धरुन पोलिस अलर्ट मोडवर आहेत.

दरम्यान, छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये २१ ऑक्टोबरला पहाटे चकमक सुरु झाली. नक्षलविरोधी अभियान राबवित असताना माओवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. यात पाच नक्षल्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही चकमक झाली.

यावेळी एक जवानही जखमी झाला आहे. जखमी जवानाला हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, मृत पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह देखील गडचिरोली येथे आणले आहेत. त्यांची ओळख पटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.

घनदाट जंगलाच्या आश्रयाने घुसखोरीमाओवाद्यांविरुध्द महाराष्ट्रासह छत्तीसगड पोलिसांनीही आक्रमकपणे मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नक्षली सैरभैर झाले आहेत. संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या काहींना अटक झाली तर काही मयत झाले. त्यामुळे ही चळवळ आता नेतृत्वहीन होत आहे. या पार्श्वभूमीवर छत्तीसगडमधील नक्षली सीमावर्ती भागातील घनदाट जंगलाचा आश्रय घेऊन गडचिरोलीत घुसखोरी करत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

'सर्च ऑपरेशन' सुरुचदरम्यान, कोपरी जंगलात पहाटे सहा वाजेपासून जवान व नक्षल्यांत चकमक सुरु झाली. दुपारी ४ वाजेपर्यंत ही चकमक सुरुच होती. त्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. परिसरात झडती घेतल्यानंतर आतापर्यंत पाच नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. यात मृत नक्षल्यांची संख्या वाढू शकते, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मोठा फौजफाटा तैनातया घटनेनंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अपर अधीक्षक यतीश देशमुख , एम .रमेश यांच्या नेतृत्वात सी -६० पथकाच्या २२ तुकड्या व सीआरपीएफ च्या शीघ्रकृती दलाच्या दोन तुकड्या या कोपर्शी जंगलात पाठविण्यात आल्या. जंगलात दोन वेगवेगळ्या ठिकाणी माओवाद विरोधी अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Gadchiroliगडचिरोली