शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पतीदेवाची क्षमा मागते, लेकरांना चांगलं सांभाळा... पत्र लिहून संपवलं जीवन

By संजय तिपाले | Updated: February 5, 2024 16:09 IST

 विवाहितेने घेतला गळफास, कोरची शहरातील घटना

संजय तिपाले, गडचिरोली: 'पतीदेवाला मी क्षमा मागते, मी तुम्हाला सोडून जात आहे, लेकरांना चांगलं सांभाळाल ही अपेक्षा आहे..' अशी सुसाईट नोट लिहून विवाहितेने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ५ फेब्रुवारीला सकाळी उघडकीस कोरची शहरात उघडकीस आली. आईने जीवनयात्रा संपविल्याने दोन  चिमुकली भावंडे मातृप्रेमाला पारखी झाली आहेत.

 अर्चना रंजित सहारे (वय ३६, रा. वॉर्ड क्र.५ कोरची) असे मृत विवाहितेचे नाव आहे. अर्चना यांचे पती रंजित यांचे गावातच ग्राहक सेवा केंद्र आहे. या दाम्पत्यास पाच वर्षांची मुलगी न्यान्सी व आरमान नावाचा दोन वर्षांचा मुलगा  अशी दोन आपत्ये आहेत. शहरातील परिचित व्यक्तीच्या कार्यक्रमातून जेवण करून रंजित व अर्चना सहारे हे दाम्पत्य वॉर्ड क्र. ५ मधील किरायाच्या खोलीवर गेले.    मध्यरात्री पत्नी अर्चनाने पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या खोलीत सुसाईट नोट आढळली. त्यात अर्चनाने 'मी जे काही करत आहे, त्याला फक्त मी जबाबदार आहे ,याच्यात कुणाचाही हात नाही, मी या जीवनाला कंटाळली आहे. मी गेल्यावर माझा परिवार सुखात राहील ही अपेक्षा आहे' असा मजकूर लिहिला आहे. सकाळी झोपेतून उठल्यावर पती रंजितला पत्नी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. कोरची पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. दुपारी ३ वाजता  अंत्यसंस्कार करण्यात आले.

कारण अस्पष्ट

दरम्यान, सुसाईट नोटमध्ये अर्चना सहारेने मी जीवनाला कंटाळली आहे... असे कारण नमूद केले आहे, पण आत्महत्येचे पाऊल उचलण्यासारखे कोणते कारण होते, हे अस्पष्ट आहे. पोलिसांनी चौकशी सुरु केली असून नातेवाईकांच्या जबाबानंतर अधिक माहिती पुढे येईल. तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली