शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

आश्रमशाळा गुरूदेव सेवा मंडळाला देणार

By admin | Updated: September 18, 2016 01:50 IST

वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे श्रध्दास्थान व स्मारक असलेली अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील

सुधीर मुनगंटीवारांचे आश्वासन : मुंबईत अधिकाऱ्यांसमवेत झाली बैठककमलापूर : वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे श्रध्दास्थान व स्मारक असलेली अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील श्री गुरूदेव आश्रमशाळा हस्तांतरणासंदर्भात एक ते दीड महिन्याच्या कालावधीत योग्य निर्णय घेऊन तो जाहीर करू, अशी कबुली मुंबईच्या बैठकीला उपस्थित राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली, अशी माहिती कमलापूर येथे बैठकीत गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली सदर आश्रमशाळा वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी १९५८ मध्ये श्रमदान व लोकसहभागातून उभारली आहे. मात्र या आश्रमशाळेची व्यवस्थापकीय मालकी एका खासगी शिक्षण संस्थेकडे आहे. सदर आश्रमशाळा गुरूदेव सेवा मंडळाकडे हस्तांतरीत करण्यात यावी, या मागणीचा आग्रह पाहून मंत्रालयात बैठक झाली. सदर आश्रमशाळा गुरूदेव सेवा मंडळाला प्रदान करण्याचा सकारात्मक विचार करण्यात आला. त्यादृष्टीने शासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी कमलापूर येथे बैठकीत दिली.मंत्रालयात झालेल्या या बैठकीला राज्याचे वित्त, नियोजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आदिवासी विकास विभागाचे प्रधानसचिव राजगोपाल देवरा, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त, नागपूरचे अप्पर आयुक्त, अहेरीचे सहायक प्रकल्प अधिकारी लाटकर, गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे आदी उपस्थित होते. कमलापूर येथील श्री गुरूदेव आश्रमशाळा सन २००३ मध्ये भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरी यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आली. तेव्हापासून सदर आश्रमशाळा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सदर हस्तांतरण बेकायदेशीर असल्याचे गीताचार्य तुकारामदादा यांच्या लक्षात आल्यावर त्यांच्या नेतृत्वात २००५ मध्ये नागपूर अधिवेशनावर मोर्चा नेण्यात आला होता. गेल्या ११ वर्षांपासून सदर आश्रमशाळा गुरूदेव भक्तांना हस्तांतरीत करण्याबाबतची मागणी निवेदन व आंदोलनातून करण्यात येत आहे. कमलापूरवासीयांनी या संदर्भात शासनस्तरावर निवेदन दिली. या निवेदनाची दखल घेऊन ७ सप्टेंबर रोजी मंत्रालयात या विषयावर बैठक पार पडली. या सर्व घटनाक्रमाबाबत माहिती कमलापूरात बैठक घेऊन देण्यात आली. या बैठकीला डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्यासह पंडित पुडके, सुखदेव वेठे, धनपाल मसराम, पुरूषोत्तम कुळमेथे, विजय खरवडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)गुरूदेव सेवा मंडळाने सुचविले तीन पर्यायमुंबई येथे झालेल्या बैठकीत गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे उपस्थित होते. त्यांनी या बैठकीत तीन पर्याय सुचविले. यामध्ये सदर शाळा शासनजमा करण्यात यावी, वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था कमलापूर या संस्थेस हस्तांतरीत करावीत, तसेच अखिल भारतीय गुरूदेव व्यायाम व शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली यांचेकडे हस्तांतरीत करण्यात यावे, या पर्यायांचा समावेश आहे.