शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नवीन धानाची आवक वाढताच व्यापाऱ्यांनी कमी केले भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 15:32 IST

यावर्षी पिकाचा दर्जा उत्तम : गरीब शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : या वर्षात समाधानकारक पाऊस, अपवाद वगळता धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला नसल्याने धान पीक जोमात आहे. कमी मुदतीच्या धानाची कापणी, मळणी पूर्ण झाली आहे. हमीभाव केंद्र सुरू होण्यास वेळ असल्याने व खुल्या बाजारात धानाला चांगला भाव असल्याने धानाची आवक वाढली आहे. यंदा शासनाच्या हमीभाव केंद्रावर धानाची रेकॉर्ड ब्रेक खरेदी होण्याचा अंदाज आहे.

सन २०२३-२४ च्या खरीप हंगामात प्रादेशिक कार्यालय गडचिरोली अंतर्गत नऊ लाख क्विंटल धानाची खरेदी झाली होती. या वर्षात ती पुन्हा लाखात वाढण्याची शक्यता आहे. या वर्षात १२ ते १३ लाख क्विंटल धानाची खरेदी होण्याचा अंदाज आहे. कमी मुदतीच्या धनाची कापणी, मळणी झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी दिवाळीपासूनच खुल्या बाजारात गर्दी केली आहे. बारीक धानाला केवळ २ हजार ४०० व ठोकळ धानाला २ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल असा सुरुवातीलाच भाव मिळत आहे. हमीभाव केंद्रावर २ हजार ३१० रुपये प्रति क्विंटल भाव व हेक्टरी पंचवीस हजार रुपये बोनस असल्याने अनेक शेतकरी आता हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. काही शेतकऱ्यांनी नोंदणीला सुरूवात केली आहे. 

भाव वाढीची प्रतीक्षा मागील वर्षी नवीन धानाला तीन हजार रूपये भाव मिळाला होता. तेवढाच भाव यावर्षीसुद्धा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता भावासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी. विक्री कमी झाल्यास धानाचे भाव आपोआप वाढतील. तोपर्यंत प्रतीक्षा करणे आवश्यक आहे.

"या वर्षात दिवाळी सणापासून धान्याची आवक वाढली असून मागच्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात जेवढा धान विक्रीसाठी आला होता तेवढा नोव्हेंबर महिन्याच्या आठ दिवसांत विक्रीला आला आहे. यावर्षी धनाचा पोतही चांगला आहे." - गिरीश बोधनकार, धान्य व्यापारी, वैरागड

"या वर्षात अतिशय समाधानकारक पर्जन्य आणि धान पिकास अनुकूल वातावरण यामुळे धान पिकाच्या उत्पादनातही कमालीची वाढ झाली आहे. हे खुल्या बाजारात विक्रीला येणाऱ्या धानाच्या अंदाजावरून लक्षात येत आहे." - दत्तू सोमनकर, धान्य व्यापारी, वैरागड.

"आदिवासी विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकाही पूर्ण झाल्या असून, नियोजनाची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण राज्यात विधानसभा निवडणुका असल्याने व या कार्यात अधिकारी व्यस्त आहेत. सध्या धान विक्रीसाठी ऑनलाइन प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे." - एच. एस. सोनवाने, उपप्रादेशिक व्यवस्थापक, आरमोरी

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली