शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

हायवेवर जेवढे स्टॉप तेवढेच ढाबे; 'अन्ना'चे परवाने कोणाकडे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 15:51 IST

कारवाई होते का? : सीमावर्ती भागातील ढाब्यांवर पोलिसांची नजर

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यात गत काही वर्षांत राज्य व राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाल्याने आंतरराज्य वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली. यामुळे या महामार्गावर ढाब्यांचीही संख्या वाढली. जिल्ह्याच्या महामार्गांवर जेवढे वाहनथांबे आहेत. तेवढेच ढाबे निर्माण झालेले आहेत. या ढाबेचालकांकडे परवाने आहेत की नाही, हा मात्र चौकशीचा विषय आहे. जिल्ह्यात राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आहे. काही ठिकाणापर्यंत महामार्गाचे कामही पूर्ण झालेले आहे. त्यामुळे या ढाब्यांची संख्या पुन्हा वाढू शकते. 

गडचिरोली- अहेरी- सिरोंचा मार्गावर सर्वाधिक ढाबे जिल्ह्यात गडचिरोली अहेरी सिरोंचा हा सर्वांत लांबीचा मार्ग आहे. या मार्गावर सर्वाधिक ढाबे आहे. जवळपास ३० हून अधिक ढाबे या मार्गावर आहेत.

पाच वर्षांत तीन ढाब्यांवर कारवाई गत पाच वर्षांत कोरची तालुक्यातील दोन ढाब्यांवर तर कुरखेडा तालुक्यातील एका ढाब्यावर पोलिसांनी दारू विक्रीच्या संशयावरून धाड टाकून कारवाई केली. येथून दारूसाठा जप्त करण्यात आलेला होता.

ढाब्यासाठी परवानगी कोणाकोणाची हवी? ढाब्यासाठी एफएसएसएआय परवाना, खाण्याच्या घराचा परवाना, आरोग्य व्यापार परवाना, दारू (वैध असल्यास) विक्री परवाना, जीएसटी नोंदणी, पर्यावरणीय मंजुरी परवाना, अग्निसुरक्षा परवाना, लिफ्ट लायसन्स साइनेज परवाना, संगीत परवाना, दुकान आणि स्थापना परवाना, रेस्टॉरंट विमा आदी परवाने आवश्यक आहेत.

अन्न प्रशासनातर्फे कारवाई शून्य जिल्ह्यातील ढाब्यांमधील नमुन्यांची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून केली जात नाही. यामुळे ढाब्यांमध्ये अवैध प्रकार चालतो. केवळ भोजनच नाही तर दारूचीही विक्री केली जाते. अशा ढाब्यांवर कारवाईची गरज आहे.

अन्न प्रशासनात मनुष्यबळाचा अभाव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची तीन पदे मंजूर असतानाही केवळ एका अधिकाऱ्याच्या भरवशावर संपूर्ण जिल्ह्याचा कारभार सुरू आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीhighwayमहामार्ग