शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

गावठी दारूच्या हातभट्टीवर आरमोरी पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 06:00 IST

लक्षमणसिंग गोविंदसिंग जुनी हा मोहफुलांची दारू गाळत आहे , अशी माहिती आरमोरी पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे जंगलात असलेल्या दारू भट्टीवर धाड टाकली. जवळच असलेल्या तणसीच्या ढगात जवळपास सहा मोहफुल भरलेले पोते आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार झाला आहे. पोलिसांनी दारूभट्टी नष्ट केली.

ठळक मुद्देआरोपी फरार : रवी गावातील जंगलात केली कारवाई; तणसाच्या ढिगात लपवून ठेवली मोहफुलांची पोती

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : स्थानिक पोलिसांनी शहरापासून सहा किमी अंतरावर असलेल्या रवी येथील जंगलातील मोहफुलाच्या हातभट्टीवर धाड टाकून सुमारे ८० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई रविवारी सकाळी ११ वाजता करण्यात आली.लक्षमणसिंग गोविंदसिंग जुनी हा मोहफुलांची दारू गाळत आहे , अशी माहिती आरमोरी पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे जंगलात असलेल्या दारू भट्टीवर धाड टाकली. जवळच असलेल्या तणसीच्या ढगात जवळपास सहा मोहफुल भरलेले पोते आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार झाला आहे. पोलिसांनी दारूभट्टी नष्ट केली. सदर कारवाई सपोनि चेतनसिंग चौहान, पोलिस उप निरीक्षक कांचन उईके, पोलीस हवालदार आनंदराव गलबले, नरेश वासेकर, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सिडाम, उमेश ताटपलान, दिनेश कुथे, देवराव केळझरकर यांनी सदर ठिकाणी छापा घालून केली. होळी व धुलीवंदन सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात दारू काढली जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. दारूची वाहतूक करणाऱ्यांचीही माहिती काढली जात आहे. आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोहफुलाची दारू काढले जाते. पोलिसांनी आता त्यांच्या विरोधात धाडसत्र सुरू करण्याची मोहीम हाती घेतली आहे.देसाईगंज येथे तीन लाख रूपयांची दारू जप्तदेसाईगंज : पोलिसांनी आरमोरी मार्गावर सापळा रचून २ लाख ८८ हजार रुपयांची दारू व पाच लाख रूपये किमतीचे वाहन असा एकूण ७ लाख ८८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील दोनही आरोपी मात्र फरार झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यातून पांढºया रंगाचे चारचाकी वाहनाने अवैधरित्या दारूची वाहतुक होत असल्याची माहिती देसाईगंज पोलिसांना प्राप्त झाली. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयास्पद स्थितीत नमुद वर्णनाचे चारचाकी वाहन आरमोरीकडे जाताना आढळून आल्याने वाहन चालकास वाहन थांबविण्याचा इशारा केला असता, चालकाने वाहन थांबवून पळ काढला. या वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी दारूच्या ९० मिली मापाच्या दारू बॉटल असलेले खरड्याचे ३६ बॉक्स आढळून आले. त्याची किंमत २ लाख ८८ हजार रुपये व वाहनाची किंमत ५ लाख रुपये, असा एकुण ७ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन अज्ञात आरोपींविरोधात देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम सह कलम १८४ तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई देसाईगंज पोलीस निरीक्षक प्रदिप लांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक हर्षल नगरकर, पोहवा वासुदेव अलोणे, पोशी गुरुदेव चौधरी, चालक पोहवा देवानंद तोडासे यांनी केली. या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदी