शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अंत्योदय रेशन कार्डधारकांना मिळणार तीन किलो साखर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 18:24 IST

गरीबांना दिलासा : जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचे नियतन मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मे महिन्याच्या रेशनसोबत जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांची तीन किलो साखर अंत्योदय लाभार्थ्यांना दिली जाणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याने साखरेची उचल करावी, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.

शासनामार्फत केवळ अंत्योदय लाभार्थ्यांना स्वस्त दरात साखर उपलब्ध करून दिली जाते. उर्वरित लाभार्थ्यांना केवळ गहू व तांदूळ दिले जाते. मागील सहा महिन्यांपासून अंत्योदय लाभार्थ्यांना नियमित साखरेचे वितरण केले जात नसल्याचे दिसून येत आहे. २०२३ या वर्षात जवळपास चार महिने साखर मिळाली नव्हती. जानेवारी महिन्यात एकाच वेळी चार महिन्यांची साखर देण्यात आली. त्यानंतर पुन्हा साखरेचे वितरण बंद पडले. आता पुन्हा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले. मे महिन्यात होणाऱ्या धान्य वितरणासोबत साखरही मिळणार आहे. एप्रिल हा एक महिना पुन्हा शिल्लक आहे. शासन नियमितपणे धान्य देत असताना साखर का देत नाही, असा प्रश्न लाभार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे. काही दिवसांनंतर साखरेचे वितरण बंद करणार की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अंत्योदय लाभार्थी वगळता इतर कार्डधारकांना साखर मिळत नाही. केवळ गहू व तांदूळ मोफत मिळते.

गहू, तांदूळ नियमित मिळते, साखर का नाही?• प्रत्येक कार्डधारकाला शासनातर्फे गहू व तांदूळ मोफत उपलब्ध करून दिले जात आहे. गहू व तांदूळ जर मोफत उपलब्ध होत असेल तर एका कार्डमागे एक किलो साखर का दिली जात नाही, असा प्रश्न आहे.

• शासनाकडून फक्त अंत्योदय लाभार्थ्यांना साखरेचे वितरण केले जाते. इतर कार्डधारकांना साखर मिळत नाही. सध्या अनियमित मिळणारी साखर लक्षात घेता शासन बंद करणार तर नाही ना, अशी शंका आहे.

पावतीमध्ये दिसणार साखरेचा उल्लेख• ग्रामीण भागातील अनेक दुकानदार साखर मिळाली नाही, असे सांगून लाभार्थ्यांची फसवणूक करतात. संबंधित लाभार्थ्याला कोणत्या वस्तू मिळणार आहेत, याची नोंद दुकानदारामार्फत देण्यात आलेल्या पावतीमध्ये असते. दुकानदार जर साखर देत नसेल तर पावती तपासावी. पावतीमध्ये जर साखरेचा उल्लेख असेल तर दुकानदार जाणूनबूजन साखर देत नसल्याचे स्पष्ट होते. याबाबतची तक्रार तालुकास्तरावरील पुरवठा विभागामध्ये करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाGadchiroliगडचिरोली