शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने नक्षल्यांकडून आणखी एका तरुणाची हत्या

By संजय तिपाले | Updated: December 3, 2023 12:50 IST

कोरची तालुक्यातील घटना: १८ दिवसांत चौघांना संपविले

गडचिरोली: जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून हत्यासत्र काही केल्या थांबायला तयार नाही. दक्षिण गडचिरोलीत तीन तरुणांची हत्या केल्यानंतर आता नक्षलवाद्यांनी आपला मोर्चा  उत्तर गडचिरोलीकडे  वळवला आहे. २ डिसेंबरच्या रात्री पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने एका तरुणाची गळा आवळून हत्या करत पत्रक सोडण्यात आले. मत तरुण एकेकाळी नक्षल्यांसाठीच काम करत होता हे विशेष.

सध्या नक्षलवाद्यांचा ‘पीएलजीए’ सप्ताह सुरु आहे. पहिल्या दिवशी भामरागड तालुक्यात बॅनर व पत्रके टाकल्यानंतर मध्यरात्री नक्षल्यांनी कोरची तालुक्यातील मुरकुटी येथील चमरा मडावी (३८) याची गळा आवळून हत्या करण्यात आली. तो पोलिस खबरी असल्याचा संशय नक्षल्यांनी मृतदेहाजवळ टाकलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे.  चमरा हा पोलिस खबरी असून नक्षल्यांच्या नावावर त्याने अनेकांकडून पैसे गोळा केल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, चमरा मडावी हा नक्षल्यांचा समर्थक होता.दारूगोळा पुरवठा करण्यासाठी त्याने नक्षल्यांकडून मोठी रक्कम घेतल्याने त्याची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिक तपासानंतर नेमके कारण समजेल असे त्यांनी सांगितले.

चमराची बहीण, मेहुणाही नक्षल चळवळीत२०२१ साली चमरा मडावी यास नक्षल्यांना बंदुकीच्या गोळ्या पुरवठा करण्याचा तयारीत असताना छत्तीसगडमधील बालाघाट जिल्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. त्याची बहीण जहाल नक्षलवादी डीव्हीसी मानसिंग होळी याची पत्नी असून ती सुद्धा नक्षल्यांच्या ‘एमएमसी’ झोनमध्ये विस्तार प्लाटून ३ मध्ये कार्यरत आहे. असे घडले हत्यासत्र...१५ नोव्हेंबरला भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे दिनेश गावडे याची गोळ्या झाडून हत्या केली होती, २३ नोव्हेंबरला टिटोळा (ता.एटापल्ली) येथे पोलिस पाटील लालसू वेडदा यांना संपविण्यात आले.२४ नोव्हेंबरला कापेवंचा (ता.अहेरी)येथे रामजी आत्राम याची हत्या झाली तर २ डिसेंबरच्या रात्री चमरा मडावी (रा.मुरकुटी ता.कोरची) याचा नक्षल्यांनी गेम केला. चारही हत्या पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून झाल्या असून नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या या घटनांनी जिल्हा हादरुन गेला आहे.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिस