शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगड सीमेलगत आणखी एक नक्षली कॅम्प उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 19:54 IST

Gadchiroli News भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या छत्तीसगड सीमेजवळील अबुजमाड भागातील जंगलात रविवारी संध्याकाळी नक्षली आणि पोलिसांत चकमक उडाली. त्यानंतर केलेल्या पाहणीत नक्षलींचा मोठा कॅम्प उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले.

ठळक मुद्देगडचिरोली पोलिसांची आठवडाभरात दुसरी कारवाई

गडचिरोली : भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या छत्तीसगड सीमेजवळील अबुजमाड भागातील जंगलात रविवारी संध्याकाळी नक्षली आणि पोलिसांत चकमक उडाली. त्यानंतर केलेल्या पाहणीत नक्षलींचा मोठा कॅम्प उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले. सोमवारी त्या ठिकाणी असलेली स्फोटके (आयईडी) जागेवरच नष्ट करण्यात आली. (Another Naxal camp near Chhattisgarh border destroyed)

गेल्या काही दिवसांत नक्षलवाद्यांना घातपाती कारवाया करण्यात यश आलेले नाही. मात्र अबुजमाडचा परिसर नक्षल्यांचा गड मानला जात असल्यामुळे, त्या ठिकाणी सुरक्षित वातावरण पाहून नक्षल्यांनी घातपाती कारवाया करण्यासाठी शिबिर लावले होते. कोठी पोलीस मदत केंद्रांतर्गत कोपर्शी व फुलनारच्या जंगलात हे शिबिर लावले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर विशेष अभियान पथकाचे जवान ऑपरेशनसाठी रवाना झाले.

रविवारी संध्याकाळी ४.३० ते ७ वाजेपर्यंत कंपनी-१० आणि भामरागड दलमच्या नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांच्या दिशेने गोळीबार करताच जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देऊन नक्षल्यांचा पाठलाग केला. यादरम्यान तीनवेळा चकमक उडाली. चकमकीनंतर जंगल परिसरात शोध अभियान राबविले. त्या ठिकाणी आयईडी, नक्षल साहित्य सापडले.ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, समीर शेख, अनुज तारे, पोलीस उपअधीक्षक (अभियान) भाऊसाहेब ढोले, सी-६० प्राणहिताचे अधिकारी योगीराज जाधव आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी