शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वाघाच्या हल्ल्यात आणखी एकाचा बळी; आरमोरी तालुक्यात महिनाभरातील तिसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 15:17 IST

आरमोरी वनपरिक्षेत्रातील इंजेवारी येथील  वासुदेव मेश्राम हे सकाळी सायकलने इंजेवारी-सिर्शी रस्त्यालगत असलेल्या जंगलात सरपणासाठी लाकडे तोडण्यासाठी गेले होते.

आरमोरी (गडचिरोली) : सरपणाची लाकडे तोडण्यासाठी सायकलने जंगलात गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना इंजेवारी येथे गुरुवारी सकाळी घडली. वासुदेव मुरलीधर मेश्राम (४५ वर्ष) रा.इंजेवारी असे मृताचे नाव आहे. गेल्या महिनाभरातील आरमोरी  तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात ठार होण्याची ही तिसरी घटना आहे.

आरमोरी वनपरिक्षेत्रातील इंजेवारी येथील  वासुदेव मेश्राम हे सकाळी सायकलने इंजेवारी-सिर्शी रस्त्यालगत असलेल्या जंगलात सरपणासाठी लाकडे तोडण्यासाठी गेले होते. याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून जंगलात फरफटत नेले.ही सदर घटना इंजेवारी गावापासून अवघ्या एक ते दीड की.मी. अंतरावर घडली.

दरम्यान रस्त्याने जाणाऱ्या एका इसमाने हे दृष्य पाहून गावात माहिती दिली. वनविभागालाही याबद्दल सांगण्यात आले. मात्र तोपर्यंत वाघाने मेश्राम यांचा बळी घेतला होता. मागील महिन्यात आरमोरीजवळील अरसोडा येथील महिला शेतकरी तसेच आरमोरी येथील एका शेतकऱ्यांचा वाघाने बळी घेतला होता. या घटनेने पुन्हा एकदा  इंजेवारी परिसरात वाघाची भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूTigerवाघ