शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांनाही होतो कॅन्सर; पशुपालकांनो, घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:32 IST

चिकित्सा केली का? दुग्ध व्यवसायावरही होतो परिणाम : वेळीच करावा औषधोपचार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : माणसांसह जनावरांनाही कर्करोग होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. जसे माणसांच्या आहार-विहारात बदल झाला तसेच बदल जनावरांच्या आहारात झालेला आहे. त्यामुळे जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी पशुपालकांनी योग्य काळजी घ्यावी.

जिल्ह्यात शेतीक्षेत्र बरेच आहे. येथील लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. याशिवाय अनेक शेतकरी पशुपालन व दुग्ध व्यवसाय करतात. त्यांच्याकडे शेती कसणाऱ्या जनावरांसह दुधाळ जनावरेसुद्धा आहेत. या जनावरांची काळजी कशी घ्यावी, याबाबत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जात असले तरी अनेक पशुपालकांना जनावरांमधील कर्करोगाची ओळख होत नाही. जनावरांमधील हा कर्करोग पशुपालकांच्या लक्षात येत नसल्याने अनेकदा जनावरांचा अकाली मृत्यू होतो.

जनावरांतही प्रमाण वाढलेज्याप्रमाणे माणसाला कर्करोग होतो. अगदी त्याचप्रकारे जनावरांना कर्करोग होतो. पाळीव कुत्री, गायी, बैल, म्हशी आदींमध्येही कर्करोगाचे प्रमाण आहे.

कर्करोगाचे दोन प्रकारजनावरांमधील कर्करोगाचे दोन प्रकार आहेत. यामध्ये बेनाइल (हळूहळू वाढणारा) व मॅलेग्नंट (जलद गतीने वाढणारा) आदी दोन प्रकारांचा समावेश आहे. सदर प्रकार वेळीच लक्षात येत नाहीत. परंतु काही लक्षणे दिसताच पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.

काय आहेत लक्षणे ?जनावरांमध्ये गाठी किंवा सूज, वजन कमी करणे, कमी खाणे-पिणे, काम करण्याची शक्ती कमी होणे, थकवा येतो. जनावरांमध्ये शिंगाचा आकार कमी कमी होत जातो, त्यामुळे त्यांना त्याचा त्रास जाणवतो. याशिवाय श्वासोच्छवास घेण्यास त्रास होतो.

काय काळजी घ्याल?पाळीव जनावरांच्या शिंगाना पेंट (वार्निस) लावला जातो. यामुळे सदर पेंट शिंगातून मांस पेशीत पोहोचतो. रंगामुळे पेशींना नुकसान होते. त्यामुळे पेंट लावू नये. जनावरांच्या पोटात प्लास्टिक जाणार नाही याची काळजी घ्यावी.

"प्लास्टिक पोटात गेल्याने फिनॉलिक कम्पाऊंड होऊन जनावरांच्या पेशीवर परिणाम होतो. याशिवाय विविध कारणांमुळे जनावरांना कर्करोग होत असल्याचेही दिसून आलेले आहे."- डॉ. सचिन ढालकरी, पशुधन विस्तार अधिकारी, चामोर्शी

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली