शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त महिलांनी काढली दारूबंदीची मशाल रॅली; गावातील दारूविक्रेत्यांना दिली सक्त ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 15:23 IST

Gadchiroli : चरवीदंड येथे रॅली काढून दारूबंदीचा एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : तालुक्यातील चरवीदंड, पालापुंडी येथील शक्तिपथ संघटनेच्या महिलांनी गावात दारूबंदी मशाल रॅलीच्या माध्यमातून दारूविक्रेत्यांच्या घरी भेट देऊन अवैध व्यवसाय बंद करण्याची ताकीद दिली. तसेच सभेच्या निर्णयाचे उल्लंघन करीत दारूविक्री केल्यास ५० हजार रुपये दंड व कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला. दारूबंदीची ही मशाल रॅली शनिवारी काढण्यात आली.

चरवीदंड येथे चरवीदंड, पालापुंडी, येडसकुही या गावातील महिलांची सभा ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलिस पाटील, तंटामुक्त समिती पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तंमुसचे अध्यक्ष मोतीराम मडावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यामध्ये दारूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी समिती नेमण्यात आली. त्यानंतर अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय घेऊन दारूविक्रेत्यावर ५० हजार रुपये दंड, ग्रामपंचायत द्वारे शासकीय दाखले व कागदपत्रे बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. महिलांच्या निर्णयाचे स्वागत करीत तिन्ही गावातील पोलिस पाटील, तंटामुक्त समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी महिलांना पूर्ण पाठिंबा दिला व स्वतःही दारूमुक्त समितीमध्ये सहभागी झाले. पालापुंडी व चरवीदंड येथे मुक्तिपथ शक्तिपथ समिती स्थापन करण्यात आली. त्यामध्ये बहुसंख्य महिलांनी सहभाग दर्शविला. 

सभेला सरपंच भोपाल कुंबरे, उपसरपंच केशीकला गोर्टकर, शामराव कुंबरे, ग्रामसेविका रसिका सिडाम, पोलिस पाटील नामदेव मडावी, रेवता कुमरे, पोलिस पाटील चेतना गोरठेकर, रमाबाई कुमरे, कौशल्या बावणे, रुखमाई जाडे, कौशल्या उसेंडी, ग्रामपंचायत सदस्य तुलावी, प्रज्ञा सहारे, माधुरी कोकोडे, शालिना कुमरे, उषा कुमरे, नीलम बावणे, शीला कुमरे, जनाबाई उसेंडी, अर्चना कुमरे, पूजा कोकोडे, वनिता परसो, वैशाली कुडमेथे, जिजा कुंबरे, मनीषा गावडे, वच्छला मडावी, सुलोचना पुसाम, वंदना कुमरे, अनुसया बावणे आदी उपस्थित होते.

तर गावात होणार दंडात्मक कारवाई यावेळी मुक्तिपथ तालुका चमूने समितीचे कार्य व उद्देश पटवून देत आपल्या गावातील अवैध दारूविक्री थांबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना सुचविल्या. दरम्यान, सभेत घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करीत चरवीदंड, पालापुंडी गावातील महिलांनी दारूबंदीची मशाल रॅली काढत दारूविक्रेत्यांच्या घरी भेट दिली. त्यांना समज देत तत्काळ दारूविक्रीचा अवैध व्यवसाय थांबविण्याचे आवाहन केले. तसेच सूचनेचे पालन न करता दारूविक्री केल्यास सभेच्या निर्णयानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे ठणकावून सांगण्यात आले. 

टॅग्स :liquor banदारूबंदीGadchiroliगडचिरोली