शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

संतप्त अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा गडचिराेलीत जेलभराे

By दिलीप दहेलकर | Updated: January 1, 2024 21:46 IST

गर्दीने पाेलिस ठाण्याचा परिसर फुलला : शासन धाेरणविराेधात नाराजी

गडचिरोली : विविध न्याय मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या नेतृत्वात राज्यभरासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी डिसेंबरपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, महिला व बालविकास विभागाने आंदोलनामुळे बंद असलेले आहार वितरणावर पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश देत पत्रक जाहीर केले आहे. दरम्यान, शासनाने प्रलंबित मागण्यांबाबत काेणतेही ठाेस निर्णय न घेतल्याने संतप्त अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी १ जानेवारी राेजी साेमवारी गडचिराेली येथे जेलभराे आंदाेलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे देवराव चवळे, डाॅ. महेश काेपुलवार, जगदीश मेश्राम, जलील पठाण, संजय वाकडे, राधा ठाकरे, कविता चन्ने, मीनाक्षी क्षीरसागर आदींनी केले. आंदाेलनात रसिका कुथे, रेखा जांभुळे, प्रमिला मने, दुर्गा कुर्वे, ज्याेती काेमलवार, रूपा पेंदाम, रत्नमाला सरदारे आदींसह सहाशे ते सातशे महिला उपस्थित हाेत्या.

अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या असून शासनस्तरावरून अद्यापही न्याय मिळाल्याने मागील चार आठवडाभरापासून सदर आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाअंतर्गत काम बंदसह जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन देण्यात आले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या काम बंद काही मागील आंदोलनामुळे दिवसांपासून जिल्हाभरातील अंगणवाड्या बंद असून लाभार्थ्यांना आहार वितरणाची प्रक्रिया ठप्प पडली आहे. ही गंभीर बाब लक्षात घेत महिला व बालकल्याण विभागाने आहार वितरणासाठी पर्यायी करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना फर्मान सोडले. २२ डिसेंबर रोजी व्हीसीद्वारे विशेष बैठक बोलावून याची होळी करीत नाराजी व्यक्त केली. विविध मागण्यांना घेऊन अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी ४ डिसेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात जिल्हाभरातील हजारो संदर्भांचे पत्रक जाहीर केले. या पत्रकामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न काढता पर्यायी व्यवस्था करण्याच्या या धोरणाचा निषेध करीत साेमवारला आंदोलनकर्त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जेलभराे आंदाेलन करीत शासनाच्या कामगार विराेधी धोरणाविरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला.

महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना इंगाेले यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालविकासमंत्री आदींना पाठविण्यात आले आहे.

या आहेत मुख्य मागण्या..

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. अंगणवडी कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शनचा कायदा करण्यात यावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटी, भविष्य निर्वाह निधी, सामाजिक सुरक्षा आदींचा लाभ देण्यात यावा. मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यात यावे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारपणाच्या रजा व खर्चपूर्ती देण्यात यावी.

महिला रुग्णालयाजवळ सभासंतप्त अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा माेर्चा धानाेरा मार्गावरील गाेंडवाना कलादालनातून दुपारी १ वाजता इंदिरा गांधी चाैकाच्या दिशेने निघाला. दरम्यान, पाेलिसांनी हा माेर्चा जिल्हा महिला रुग्णालयाजवळ थांबविला. दरम्यान, येथे विशाल सभा पार पडली. यावेळी डाॅ. महेश काेपुलवार, देवराव चवळे व इतर महिला पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या अन्यायकारक धाेरणाचा खरपूस समाचार घेतला.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली