शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अन् मृत्यूच्या दाढेतून ते सुखरूप बाहेर आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 18:13 IST

पाण्यातून पलिकडे जाण्याची ‘हिंमत’ दाखवत त्यांनी गाडी पुढे दामटली. पण हा अतिआत्मविश्वास त्यांना नडला आणि त्यांची कार वाहत्या पाण्यासोबत नाल्याच्या पाण्यात पडली.

 गडचिरोली -  संततधार पावसामुळे नाल्याला पूर आलेला होता. नाल्यावरच्या छोट्या पुलावरूनही पाणी वाहात होते. त्या पाण्यातून पलिकडे जाण्याची ‘हिंमत’ दाखवत त्यांनी गाडी पुढे दामटली. पण हा अतिआत्मविश्वास त्यांना नडला आणि त्यांची कार वाहत्या पाण्यासोबत नाल्याच्या पाण्यात पडली. दैव बलवत्तर म्हणून वेळीच लोकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृत्यूच्या दाढेतून त्यांना सुखरूप बाहेर काढले.

निखिल सत्यनारायण चेरकरी (२७) आणि देवदत्त शरद धारणे (२६) रा.कन्नमवार वार्ड, गडचिरोली अशी त्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही मंगळवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास एका कारने गडचिरोलीपासून पोटेगावच्या दिशेने निघाले होते. १० किलोमीटरवर असलेल्या गुरवळजवळ शिवमंदिराच्या अलिकडे असलेल्या नाल्याला पूर आला होता. पुराचे पाणी पुलावरून वाहात होते. पण दोघांनीही अतिआत्मविश्वास दाखवत वाहत्या पाण्यातून कार काढण्याचा प्रयत्न केला. परिणाम पाण्याच्या प्रवाहासोबत कार पुलाखाली पडून नाल्यात जवळपास ५० फूट वाहात गेली व एका झाडाला अडली. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकाराने त्या युवकांची चांगलीच भंबेरी उडाली. पण प्रसंगावधान राखत एकाने गाडीच्या टपाला पकडले तर दुसरा लगतच्या झाडावर चढला. हे दृष्य पाहात असलेल्या नाल्याच्या काठावरील लोकांनी लगेच गडचिरोली पोलीस ठाण्याला फोन करून माहिती दिली. पोलीस सर्व साहित्यानिशी घटनास्थळी दाखल झाले आणि ट्युब व दोराच्या सहाय्याने त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. यावेळी तहसीलदार डी.एस.भोयर, नायब तहसीलदार किरमे, दुरणकर, मडावी तसेच सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय उदार, उपनिरीक्षक विवेक सिसाळ, सहायक फौजदार सहारे, गौरकर, तिम्मलवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीRainपाऊसnewsबातम्या