शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अन् रस्ता सोडून बस ३० मीटर घुसली जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 23:50 IST

नागपूरवरून प्रवाशी घेऊन एमएच ४०, क्यू ६१७१ क्रमांकाची बस सिरोंचाकडे जात होती. निमलगुडम गावाजवळ असलेल्या डोंगरदेवाजवळ बसचा समोरील पट्टा तुटला. त्यामुळे स्टेअरिंग जाम झाले. त्यामुळे भरधाव असलेल्या बसवरील नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या बाजूला जवळपास ३० मीटर अंतर पुढे गेली. रस्त्याच्या बाजूला जंगल आहे. मात्र झाडे विरळ असल्याने बसची झाडाला धडक बसली नाही.

ठळक मुद्दे२० प्रवासी बचावले : निमलगुडम गावाजवळची घटना; चालकाने दाखविले प्रसंगावधान

लोकमत न्यूज नेटवर्कगुड्डीगुडम : निमलगुडम गावाजवळील डोंगरदेवजवळ नागपूरवरून सिरोंचाकडे जाणाऱ्या बसचे स्टेअरिंग जाम झाल्याने भरधाव बसटी बस रस्त्याच्या बाजूला जवळपास ३० मीटर जंगलात शिरली. प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणाºया या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर घटना शुक्रवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.नागपूरवरून प्रवाशी घेऊन एमएच ४०, क्यू ६१७१ क्रमांकाची बस सिरोंचाकडे जात होती. निमलगुडम गावाजवळ असलेल्या डोंगरदेवाजवळ बसचा समोरील पट्टा तुटला. त्यामुळे स्टेअरिंग जाम झाले. त्यामुळे भरधाव असलेल्या बसवरील नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या बाजूला जवळपास ३० मीटर अंतर पुढे गेली. रस्त्याच्या बाजूला जंगल आहे. मात्र झाडे विरळ असल्याने बसची झाडाला धडक बसली नाही. या बसमध्ये एकूण २० प्रवाशी बसले होते. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. सदर बस एच. बी. कुळमेथे हे चालवित होते, तर वाहक म्हणून एन.आर. नारवे होते. गडचिरोली जिल्ह्यात बस अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आगारातून बस निघतेवेळी तपासणे आवश्यक आहे. मात्र बस तपासली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. एसटीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.एटापल्ली मार्गावरही टळली दुर्घटनाअहेरी : एटापल्ली मार्गावरील येलचिल वळणावर धावत्या बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने बस रस्त्याच्या बाजूला गेली. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने बस नियंत्रित होऊन कोणतीही जीवित हानी झाली नाही. अहेरी आगाराची एमएच-०७, सी-९५४५ ही बस गडचिरोलीवरून बोलेपल्ली मार्गे अहेरीसाठी निघाली. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान येलचिल गावाजवळील पहाडाच्या वळणावर येताच या बसचे स्टेअरिंग लॉक झाले. ही बाब लक्षात येताच चालक एम.एम. कोवे यांनी बस थांबविली. तरीही बस रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. यावेळी समोरून एखादे वाहन येत असते तर मोठी दुर्घटना घडली असती. चालकाने वाहन दुरूस्त करून पुन्हा अहेरीकडे मार्गस्थ केले. अहेरी आगाराच्या बसमध्ये वेळोवेळी बिघाड निर्माण होत असल्याने प्रवाशी त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :state transportएसटीAccidentअपघात