शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णवाहिका झाडाला धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:41 IST

एका रूग्णाला अहेरीच्या रूग्णालयात पोहचवून पेरमिलीकडे परत येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पेरमिली प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्णवाहिका रस्त्यालगतच्या झाडाला धडकली. यात चालक जखमी झाला. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास आलापल्ली- पेरमिली मार्गावर आरेंदा फाटयानजीक घडली.

ठळक मुद्देचालक जखमी : आरेंदा फाट्यानजीकची घटना; रिकाम्या वाहनामुळे टळली जीवित हानी

लोकमत न्यूज नेटवर्कपेरमिली : एका रूग्णाला अहेरीच्या रूग्णालयात पोहचवून पेरमिलीकडे परत येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पेरमिली प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्णवाहिका रस्त्यालगतच्या झाडाला धडकली. यात चालक जखमी झाला. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास आलापल्ली- पेरमिली मार्गावर आरेंदा फाटयानजीक घडली. विनोद सांगरे असे जखमी वाहनचालकाचे नाव आहे.पेरमिली येथील रहीवासी विजय दुर्गे (५०) या रूग्णाला औषधोपचारासाठी सुरूवातीला पेरमिलीच्या आरोग्य केंद्रात भरती केले होते. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. ईशान तुरकर यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. पुढील उपचारासाठी अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात रेफर करण्यास सांगितले. त्यानंतर या केंद्राच्या रूग्णवाहीकेने सदर रूग्णाला अहेरीच्या रूग्णालयात पोहचविले. येथून रुग्णवाहिका घेऊन चालक विनोद सांगरे पेरमिलीकडे एकटाच निघाला. दरम्यान आलापल्ली- पेरमिलीच्या मधात आरेंदा फाटयानजीक समोरून ट्रक आला.या ट्रकचालकाकडून साइड मिळाली नाही. अशा स्थितीत आरोग्य विभागाचे एम. एच. ३३-जी ६६९ क्रमाकांचे हे वाहन रस्त्यालगतच्या झाडावर आदळले. यात वाहन चालक विनोद सांगरे जखमी झाला. सदर घटनेचा तपास पेरमिलीचे प्रभारी पोलीस अधिकारी महेश मतकर करित आहेत.पल्स पोलिओ मोहिमेसाठी वाहन उपलब्ध करणारअपघातामुळे पेरमिली केंद्राची रूग्णवाहीका पूर्णता क्षतीग्रस्त झाली. त्यामुळे आता पल्स पोलिओ मोहीमेसाठी वाहनाची अडचण निर्माण झाली आहे. यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. ईशान तुरकर यांना विचारणा केली असता रविवारी होणाऱ्या पल्स पालिओ मोहीमेसाठी दुसऱ्या वाहनाची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात