शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नऊ पीएचसींना मिळाल्या रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:26 IST

जिल्ह्यात आरोग्य सेवेत आवश्यक सुविधांची मोठ्या प्रमाणात वाणवा आहे. विशेष म्हणजे रूग्णवाहिकांची कमतरता असल्यामुळे वेळेवर रूग्ण रूग्णालयापर्यंत पोहोचविण्यास उशिर होतो. प्रसंगी रूग्ण दगावण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय सहाय्यता निधीमधून २० रूग्णवाहिका निर्लेखीत केल्या.

ठळक मुद्देरुग्ण रेफरची सेवा तत्काळ मिळणार : केंद्रीय सहायता निधीतून २० रुग्णवाहिका निर्लेखनास पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात आरोग्य सेवेत आवश्यक सुविधांची मोठ्या प्रमाणात वाणवा आहे. विशेष म्हणजे रूग्णवाहिकांची कमतरता असल्यामुळे वेळेवर रूग्ण रूग्णालयापर्यंत पोहोचविण्यास उशिर होतो. प्रसंगी रूग्ण दगावण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय सहाय्यता निधीमधून २० रूग्णवाहिका निर्लेखीत केल्या. यापैकी नऊ रूग्णवाहिकांचे लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच करण्यात आले. दुर्गम भागातील नऊ पीएचसींना नवीन रुग्णवाहिका मिळाल्या.सदर रूग्णवाहिकांच्या चाव्या रूग्णवाहिका चालकांकडे सोपवून त्यांना रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता भांडेकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प. उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अजय कंकडालवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, जि.प. चे कृषी सभापती नाना नाकाडे, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील २० प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिका निर्लेखनास पात्र झाल्या. यापैकी भामरागड तालुक्यातील आरेवाडा, मन्नेराजाराम, लाहेरी, एटापल्ली तालुक्यातील कसनसूर, गट्टा, धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, सिरोंचा तालुक्यातील टेकडाताला, अंकीसा, अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, कमलापूर या प्राथमिक आरोग्य केंद्रांना रूग्णवाहिका मंजूर झाल्या. यापैकी नवीन नऊ रूग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले असून अंकीसा प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकरच रूग्णवाहिका प्राप्त होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून कमलापूर येथील आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांची हेळसांड होत होती. वाहनाअभावी तत्पर आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे सदर आरोग्य केंद्राला स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कमलापूरच्या सरपंच रजनीता मडावी यांच्यासह ग्रामस्थांनी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.पवनकुमार उईके यांच्याकडे निवेदनातून केली होती. शासनाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. अखेर कमलापूर आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळाली. त्यामुळे ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कमलापूर पीएचसीच्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पणाप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन कुमार उईके, गजेंद्र रंधये, अनिल भट, प्रकाश दुर्गे, सुनील भट, नंदू येनगंटीवार व कर्मचारी हजर होते.उर्वरित ११ केंद्रांनाही मिळणार-डीएचओजिल्ह्यातील २० प्राथमिक आरोग्य केंद्राच्या २० रुग्णवाहिका नियमाप्रमाणे निर्लेखनास पात्र झाल्या आहेत. संबंधित वाहनाची वय, कालावधी, किमी अंतर व इतर सर्व बाबीनुसार ही वाहने निर्लेखनास पात्र करण्यात आली. मात्र सदर वाहने अजूनही वाहतुकीवर आहेत. केंद्रीय सहाय्यता निधीतून नऊ आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या. आता उर्वरित ११ केंद्रांना लवकरच नव्या रुग्णवाहिका मिळणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. ११ जुनी वाहने वाहतुकीवर आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल