डासांपासून होणार बचाव : उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कारजिमलगट्टा : वीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या शहीद दिनाचे औचित्य साधून अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे वीर बाबुराव शेडमाके स्मारक समितीच्या वतीने गरजू नागरिकांना मच्छरदानीचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील येदरंगा, मेडपल्ली, रसपल्ली, अर्कापल्ली, गुंडेरा, वेडमपल्ली, येरागड्डा आदी गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी जिमलगट्टाचे उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव, प्रभारी अधिकारी अविनाश गायकवाड, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक गुंड, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक हेमने, सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव शेडमाके, पुलय्या वेलादी आदींचा शाल, श्रीफळ देऊन शेडमाके समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष बापू मडावी, उपाध्यक्ष सुंदर नैताम, सचिव राकेश पोरतेट, बाजीराव मडावी, किरण मडावी, आनंद मिसाळ, पुलय्या वेलादी आदींसह बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. मच्छरदानीमुळे डासांपासून बचाव होणार आहे. (वार्ताहर)
जिमलगट्टात नागरिकांना मच्छरदानीचे वाटप
By admin | Updated: October 25, 2016 00:58 IST