शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

पेद्दीवार यांच्यावरील दारूवाटपाचे आराेप खाेटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST

गडचिराेली : धानाेरा तालुक्याच्या दुधमाळा येथील मुक्तिपथ कार्यकर्ता अक्षय पेद्दीवार यांच्यावर काकडवेलीवासीयांनी केलेले दारूवाटपाचे आराेप पूर्णत: खाेटे आहे, ...

गडचिराेली : धानाेरा तालुक्याच्या दुधमाळा येथील मुक्तिपथ कार्यकर्ता अक्षय पेद्दीवार यांच्यावर काकडवेलीवासीयांनी केलेले दारूवाटपाचे आराेप पूर्णत: खाेटे आहे, असा ठराव दुधमाळा व फासीटाेला ग्रामसभेने पारित केला आहे.

दुधमाळा व फासीटोला ग्रामवासीयांनी ग्रामसभा ठराव घेऊन हे जाहीररीत्या मांडले आहे. एवढेच नाही तर आदिवासी सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, पोलीस निरीक्षक, धानोरा पोलीस स्टेशन, सर्च शोधग्रामचे संचालक डॉ. अभय बंग, संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती धानोरा, संचालक मुक्तिपथ अभियान यांना ग्रामसभेचा ठराव सादर करून आपले म्हणणे दोन्ही गावांनी मांडले आहे.

काकडवेलीमधील काही कुटुंबांनी ग्रामसभेचा चुकीचा वापर केला आहे. राजकीय द्वेषभावनेतून अक्षय पेद्दीवार यांच्यावर राग काढण्यात आला. एखाद्या व्यक्तीविरुद्ध द्वेष काढण्यासाठी ग्रामसभेचा वापर करू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले. काकडवेली ग्रामसभा अध्यक्ष घन्सू दुगा व सचिव विश्वनाथ पदा यांनी ग्रामसभेचा हा चुकीचा वापर केल्याचा आरोप करत त्याकरिता ग्रामसभा महासंघाने काकडवेली ग्रामसभेवर कारवाई करावी, अशी मागणी दुधमाळा व फासीटोला गाववासीयांनी ठराव घेऊन केली आहे.

पेद्दीवार यांनी दारूवाटप केलेले नाही, तर काकडवेली येथील दारूबंदीकरिता स्वतः मुक्तिपथ चमू व काकडवेली गाव संघटनेच्या मदतीने प्रयत्न केले. ग्रा.पं. निवडणुकीत काकडवेली गटाचा एक उमेदवार निवडून येऊ शकणार नाही, असा अंदाज घेत हा व्यक्तिगत विरोध करण्यात आला आहे, असे दुधमाळा व फासीटोलावासीयांनी घेतलेल्या ठरावामध्ये नमूद केले आहे.

(बॉक्स)

मुक्तिपथ म्हणते, आमचा कार्यकर्ता निर्दोष

मुक्तिपथ अभियानाचा कार्यकर्ता अक्षय पेद्दीवार यांच्यावरील आरोपाच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली, त्यात सदर आरोपासंदर्भात कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. त्यामुळे आरोप पूर्णत: खोटे होते, असे आढळल्याचे मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता यांनी कळविले.