शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वाघाची शिकार केल्याप्रकरणी सर्व आरोपींना १४ पर्यंत न्यायालयीन कोठडी

By गेापाल लाजुरकर | Updated: August 2, 2023 20:10 IST

गडचिरोली तालुक्याच्या आंबेशिवणी जंगल परिसरात आरोपींनी दोन वाघांची शिकार केली होती.

गडचिरोली : तालुक्याच्या आंबेशिवणी येथील जंगलात दोन वाघांची शिकार प्रकरणात अटकेत असलेल्या बावरिया जमातीच्या ११ आरोपींना न्यायालयाने २ ऑगस्टपर्यंत वन कोठडी सुनावली होती. बुधवारी पुन्हा त्या आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना १४ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

तालुक्याच्या आंबेशिवणी जंगल परिसरात आरोपींनी दोन वाघांची शिकार केली होती. सदर प्रकरणात दोनपेक्षा अधिक वाघांची शिकार झाल्याचा संशय आहे. त्यानुसार सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या नेतृत्वात आरोपींची चौकशी सुरू होती. यासाठी आरोपींना २ ऑगस्टपर्यंत वन कोठडी मागितली होती. वन कोठडी संपल्यानंतर ११ आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ ऑगस्टपर्यंत वन कोठडी सुनावली. विशेष म्हणजे, दोन महिला आरोपी ९ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.

माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळदरम्यान, व्याघ्र शिकार प्रकरणात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीपासूनच मोठी गोपनीयता बाळगली आहे. एकवेळा वाढीव कोठडी घेतली; पण तपासात ठोस काही हाती लागले नाही. त्यामुळे माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यासंदर्भात गडचिरोली वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांना विचारले असता, सखोल चौकशी सुरू आहे. दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर अधिक माहिती देऊ, असे सांगितले. तपास अधिकारी व सहायक वनसंरक्षक सोनल भडके हे तर भ्रमणध्वनीही घ्यायला तयार नाहीत.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारीTigerवाघ