पालकमंत्र्यांची माहिती : जिल्हा विकासावर भर देणारगडचिरोली : ३० जानेवारी २०१५ रोजी अहेरी येथे जिल्हास्तरीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात पाच ते सहा हजार बेरोजगार युवकांची उपस्थिती राहिल. या रोजगार मेळाव्यासाठी २०० ते २५० कंपन्यांचे प्रतिनिधी येणार आहेत, अशी माहिती आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी सोमवारी सर्कीट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सदर रोजगार मेळाव्याला खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करण्यात येणार असून बरोजगार युवकांना रोजगारासंदर्भात कामाचे आदेशही दिले जातील, असेही पालकमंत्री आत्राम यावेळी म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या डीपीडीसीच्या बैठकीत सन २०१६-१७ या वर्षासाठी ११९ कोटी ४४ लक्ष रूपयाचा सर्वसाधारण गटाचा प्रस्ताव व सन २०१५-१६ च्या प्रस्तावातील पुनर्विलोकन अहवाल नियोजन समितीपुढे सादर करण्यात आला, असेही पालकमंत्री आत्राम यांनी सांगितले. जिल्ह्याच्या सर्व विभागाची २०१५-१६ वर्षाच्या तरतुदीतील ७० टक्के निधी खर्च झाला असून उर्वरित निधी लवकरच खर्च करण्याच्या सूचना आपण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असेही पालकमंत्री आत्राम यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)
३० जानेवारीला अहेरीत जिल्हास्तरीय रोजगार मेळावा
By admin | Updated: January 12, 2016 01:19 IST