शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा ३५ एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 05:00 IST

९ नाेव्हेंबर राेजी गडचिराेली आगारातील तीन, अहेरी सहा व ब्रह्मपुरी आगारातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. १० नाेव्हेंबर राेजी ३४ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले हाेते. अशा एकूण ४८ कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली हाेती. आता एकूण कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ८३ झाली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी मागील २० दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. २० नाेव्हेंबर राेजी गडचिराेली आगारातील राेजंदारी चालक कम वाहक असलेल्या १६ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे, तर विभागीय कार्यालयात असलेल्या १९ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, यातून काेणताही ताेडगा निघाला नसल्याने, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तीनही आगारांतील जवळपास ५०० कर्मचारी संपावर आहेत. कामावर गैरहजर असल्याच्या कारणावरून २० नाेव्हेंबर राेजी ३५ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

विद्यार्थ्यांचे हाेणार हाल-    २२ नाेव्हेंबरपासून राज्यभरातील शाळा सुरू हाेत आहेत. गडचिराेली व अहेरी आगारातील एकूण बससंख्येच्या जवळपास निम्म्या बसेस मानव विकास मिशनच्या आहेत. -    बससेवा उपलब्ध असल्याने २० ते ३० किमी अंतरावर असलेल्या शाळेत मुला-मुलींना प्रवेश घेतला हाेता, तसेच इतर विद्यार्थ्यांनाही पास दिली जात हाेती. या पासमध्ये जवळपास ६५ टक्के सूट दिली जाते. -    मात्र, बससेवा बंद असल्याने एवढ्या दूरच्या शाळेत जायचे कसे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमाेर निर्माण झाला आहे. त्यांचे यामुळे शैक्षणिक नुकसान हाेत आहे.

४८ कर्मचाऱ्यांवर यापूर्वी झाली कारवाई

९ नाेव्हेंबर राेजी गडचिराेली आगारातील तीन, अहेरी सहा व ब्रह्मपुरी आगारातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. १० नाेव्हेंबर राेजी ३४ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले हाेते. अशा एकूण ४८ कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली हाेती. आता एकूण कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ८३ झाली आहे. 

खासगी वाहतूक जाेरातएसटीच्या फेऱ्या बंद असल्याचा पुरेपूर फायदा खासगी वाहतूकदारांनी उचलण्यास सुरुवात केली आहे. फारशी तिकीटवाढ केली नसली, तरी प्रवाशांना काेंबून भरले जात आहे. काही प्रवासी तर मागे लटकून प्रवास करीत आहेत. एसटीचा संप लवकर मिटावा, अशी अपेक्षा हाेत आहे.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप